मानवी आयुष्याची नाळ जोडणारी ‘माती’; विष्णू संकपाळ

मानवी आयुष्याची नाळ जोडणारी ‘माती’; विष्णू संकपाळपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शुक्रवारीय हायकू काव्य परीक्षण

भारतीय तत्वज्ञानानुसार अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी या पंचतत्वांनी आपले शरीर व्यापले आहे. यापैकी पृथ्वी या तत्त्वाचा एक चतुर्थांश भाग जैव विविधतेने व्यापलेला आहे. देह मातीचा मातीत जाणार.. ज्या मातीतून प्रारंभ त्याच मातीत अंत निश्चित आहे. झाडे मात्र अंतानंतरही मातीत मिसळून तिची सुपीकता वाढवून मातीचे ऋण फेडतात. पण मानव जिवंतपणीही कृतघ्नतेने वागतोय. त्याच्या हव्यासाची पूर्ती आणि गरजा पूर्ण करता करता जमीन मात्र झिजते आहे. भविष्यात अन्नसाखळीत प्रभावी भूमिका निभावणारी सुपीक माती टिकवून ठेवणे हे फार मोठे आव्हान आहे. हव्यास, अतिक्रमण, प्रदूषण, यांचे हल्ले हीच माती असहाय्यपणे सोसत आहे. याची किंमत मानवाला चुकवावी लागेल यात शंका नाही.

आज विज्ञान चंद्रावर गेले तरीही ‘माती वाचून शेती’ ही कल्पनाच असंभव आहे. आज बदलत्या युगात अन्नधान्य निर्मितीत झालेले काही अमूलाग्र बदल, संकरीत बी बियाणांचा शोध यातून संख्यात्मक वृद्धी जरूर झाली असली तरीही सेंद्रिय शेती, खते कालबाह्य होत आहे .रासायनिक खते, किटकनाशके यामुळे मातीतील पोषक तत्वे , चव, गुणधर्म झपाटय़ाने नष्ट होत आहेत. पूर्वी हाच पोत कायम ठेवताना पीकबदल हा पर्याय राबवला जायचा.. मातीची जात आणि प्रकारानुसार पिके घेतली जायची. मात्र ही संकल्पना आज मोडीत निघते आहे.

विफल निती
माती वाचून शेती
आव्हान मती

मातीशी असलेली जीवाची नाती अभेद्य आहेत, म्हणूनच कुठेही गेले तरी आपल्या मातीशी माणूस नाळ जोडून ठेवतो. सीमेवरील सैनिकासाठी देशाची माती माथ्याचा तिलक, तर शेतकर्‍यासाठी ती काळी आई असते. कणभर पेरावे आणि मणभर घ्यावे अशी ही माती माणिक मोती पिकवून समस्त जीवसृष्टीला पोसत असते. काल समूह प्रमुख आदरणीय राहूल दादांनी दिलेले, कोवळ्या हातातील ओंजळभर मातीचे चित्र म्हणूनच खूप बोलके आहे. या हायकू काव्याच्या माध्यमातून प्रभावीपणे माती महती व्यक्त करणारे, प्रबोधनात्मक, कलात्मक, कलाटणीयुक्त हायकू आशय अपेक्षित होते.

एक सामाजिक, राष्ट्रीय, नैसर्गिक भान कायम जपणारा अभिनव दृष्टीकोन राहुलदादा कायम दाखवत असतात. कालचे हायकू स्पर्धेचे चित्र त्याचाच एक भाग होते. जाता जाता इतकेच सांगू इच्छितो की, हायकू साकारताना कलात्मकता, कलाटणी, आणि परिणामकारकता यांचा अचूक समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा. तो, ती, हा, ही, हे असे भरीचे एकाक्षरी वापर टाळावेत. आणि “वाह क्या बात” असा भाव व्यक्त होणारी सकस हायकू निर्मिती व्हावी हीच अपेक्षा..!! सर्वांच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा. आज मला हायकू परिक्षण लिहायची संधी मिळाली. याबद्दल आदरणीय दादा आणि समूह प्रशासनाचे मनापासून खूप खूप आभार…!

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles