प्रसिद्ध कवयित्री माधुरी गोतमारे’ यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार

प्रसिद्ध कवयित्री माधुरी गोतमारे’ यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर व यशवंतराव चव्हाण सेंटर, केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ सोहळ्याच्या पहिल्या सत्रात ‘मराठीचे शिलेदार’ प्रकाशनाच्या १४ कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवशी ‘जागर मराठीचा’ या कार्यक्रमात मंगळवार, दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट इमारत’, ए. आर. डी. सिनेमा हॉलच्या मागे, मलकापूर रोड, बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला.

या संमेलनात राज्यातील ९५ कवी कवयित्रींना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर येथील प्रसिद्ध कवयित्री माधुरी अविनाश गोतमारे यांनाही राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार साहित्य प्राप्त झाले. त्यात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व जागर मराठीचा विशेषांक याचा समावेश आहे.

माधुरी गोतमारे या गेल्या पाच वर्षांपासून लिखाण करीत आहे. लेख, लघुकथा, कविता इत्यादी त्यांचे साहित्य लिखाण आहे. कवयित्री मागील चार वर्षापासून ‘मराठीचे शिलेदार’ साहित्य समूहाशी जोडल्या आहेत. नागपूर येथील मुंडले शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होते. मागील तीन वर्षापासून कार्यातून रजा घेतली आहे. बुलढाणा येथील साहित्य संमेलनात मिळालेल्या सन्मानासाठी सर्व कुटुंबीयांनी भरभरून कौतुक केले. यासाठी समूहाचे सर्वसर्वा राहुल सर, सविताताई ह्यांचे मनापासून त्यांनी आभार मानले. साहित्य क्षेत्रातील हा पहिला बहुमान प्राप्त झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles