अमर आशावादाचे प्रतिक ‘ऋतुराज वसंत’; अनुराधा भुरे

अमर आशावादाचे प्रतिक ‘ऋतुराज वसंत’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शिशिराची जीवघेणी थंडी संपत आली, की चाहूल लागते ती ऋतुराज वसंताची. सर्व ऋतूंचा राजा व निसर्गाचे चैतन्य म्हणजे वसंत. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यात वसंत ऋतू असतो, परंतु क्रमिक पाठ्यपुस्तकानुसार चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने आहेत. तरीही वसंत पंचमीपासून ‘वसंतोत्सव’ सुरू होतो असे मानले जाते.

नवचैतन्य ,उत्कर्ष ,नाविन्य, आनंद यांचे प्रतीक म्हणून वसंत ऋतू ओळखला जातो. भारतात साधारणपणे मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाचा हा काळ. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून विद्येची देवता सरस्वती मातेचा जन्मदिन वसंत पंचमी हा असल्यामुळे त्या देवतेचे पूजन करण्याची प्रथा या वसंत ऋतूत आहे. याच ऋतूत वातावरणात थंडी कमी होऊन मोसम अतिशय प्रफुल्लित होतो. झाडांवर नवीन पालवी यायला सुरुवात होते. आंब्याच्या झाडांवर मोहर जाऊन इवल्या इवल्या कैऱ्या वाऱ्यावर डोलत असलेल्या दिसतात. सकाळी वातावरणात सुखद गारवा असतो. आणि नंतर उष्णता सुद्धा दुपारी अनुभवायला मिळते. पण याच दरम्यान या अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे पित्त व कफ प्रवृत्ती बळावते. लहान मुलांमध्ये न्युमोनिया, गोवर , कांजण्या यासारखे आजार कुठेकुठे आढळून येतात.

विविध प्रकारचे फुले झाडांवर उगवतात ज्यामुळे सर्व वातावरण सुगंधित होऊन जाते. वसंताचा उत्सव हा निसर्गचा उत्सव आहे. तो वसंत पंचमी या दिवसापासून सुरू होतो. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यौवन नाही का? सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो. स्वतःच्या आगळ्या सौंदर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो. सर्व दुःख वेदांनाना तत्काळ पुरेसे विस्मरण देणारा निसर्ग एक जादूगार आहे.

निसर्गात अहंकार शून्यत आहे. तो भरभरून देतच राहतो वसंत असो की वर्षा वेगवेगळ्या स्वरूपात तो माणसाला आपली प्रचिती देत आला आहे. वसंताचा उत्सव हे ‘अमर आशावादाचे प्रतीक’ आहे. यामुळे वसंताचा खरा पुजारी जीवनात कधीच निराश बनत नाही. शिशिर ऋतूत झाडाचे पाने गळून पडतात तो स्वतःच्या जीवनातील निराशा झटकून टाकतो. याच दरम्यान शिवरात्र ,रंगपंचमी, होळी, गुढी पाडवा इत्यादी सण येतात. मंगल कार्याला विवाहाला सुरुवात झालेली असते. दुपारच्या उन्हामुळे बर्फ वितळायला सुरुवात होतो.त्यामुळे बर्फाळ प्रदेशातील खुरटं गवत आपल्या तुकतुकीत रंगामुळे नजरेत भरत ,आपल अस्तित्व दाखवत. कोकीळ पक्षाचे मधुर संगीत, सुखद गार उष्ण वातावरण झाडांवर, आलेले रंगीबेरंगी सुगंधी पिवळी रंगीत फुले, सुंदर प्रभात व सायंकाळी क्षितीजावर हळूहळू रेंगाळत जाणारा सूर्य याच दरम्यान अनुभवायला मिळतो.

‘जीवन व वसंत’ ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती संत म्हणते. ज्याच्या जीवनात नेहमी वसंत फुललेला असतो तो म्हणजे संत. यौवन व संयम ,आशा व प्रसिद्धी, कल्पना आणि वास्तव , भक्ती व शक्ती ,सर्जन व विसर्जन या सर्वांचा समन्वय साधणारा तसेच जीवनात सौंदर्य संगीत व स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या सर्वांच्या जीवनात फुलत राहावा हीच मनोकामना.

अनुराधा अर्जुन गळेगावे (भुरे)
तालुका मुदखेड,जिल्हा नांदेड
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles