मळभ; वनिता गभने

मळभपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कधीकाळी रोजच यायचे ‘ते’
नैराश्याला घेऊन..
आणि गोचिडासारखे बसायचे
मनावर चिकटून…
शोषून घ्यायचे जीवनातील
हर्षित क्षण..
आणि करून जायचे
विषण्ण मन..
पण, आजकाल मी ‘त्याला’
दुरूनच बाय- बाय करते…
जीवनपटाच्या चित्रफितीत,
सकारात्मकता भरते…
जीवन म्हणजे काय हो?
सुख-दु:खाच्या समसमान
धाग्याने विणलेले वस्त्र…
आशा-निराशा, यश-अपयश
यांचे भ्रमनीय नक्षत्र…
म्हणून काय मी ‘त्याला’
डोक्यावर घेऊन नाचू..?
मानवरूपी या अमूल्य जीवनाला
का बरे ‘त्याच्यासाठी’ ठेचू?
आता मी ‘त्याला’ थाराच देत नाही
भिरभिरते ‘ते’ आसपास.!
मी ‘त्याला’ आतच घेत नाही…
कोण ‘ते’…?
तेच ते ,भिती,दु:ख,संशय,नैराश्य
यांचे काळेकुट्ट ‘मळभ’
आता मला नको आहे..
‘ते’ जर आत आले तर,
जीवन सारे धुके आहे…
म्हणून सांगते मी गड्या,
दूरच ठेवा ‘त्याला'(मळभ)
जगून घ्या प्रेम -हर्षाने
कधीही होऊ शकतो,
यमाचा घाला….

वनिता गभणे आसगाव भंडारा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles