आक्का; डॉ ज्ञानेश्वर माशाळकर

आक्कापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आक्का गेल्यावर कळले
आक्का काय असते.
फक्त जीवघेणा भास .
वस्तूंना त्या उरतोच,
तुझ्या हातचा मोकळ्याचा वास.

गेली चोवीस वर्षे.
जिथे तिथे फक्त तुझ्या,
आठवणी त्या पेरलेल्या.
फक्त येतात सोबतीस ,
संवेदना त्या उरलेल्या.

मी सगळ्यात असूनही मग,
उरतो तो रिकामेपणा.
खोटं खोटं हसण्याचा,
दाखवतो दिखावपणा.

माझं काही विसरलं का ,
विचारायची तू सदा .
डोळ्यात तुझे चित्र ,
तुझी आठवते अदा.

17 मार्च 2000 तोच दिवस
निरोपाच्या असे समयी
डोळ्यात पाणी, हृदयात ओड
खोल आत हरवून बघायची ,
तुझी जुनीच आहे गोड.

खूप काही मागे ठेवी,
आक्का उरते ही नंतर .
कितीही केली भ्रमंती ,
नाही येत तुझी सर.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता. उमरगा,जिल्हा धाराशिव
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles