स्त्रीचे स्वातंत्र्य; वनिता लिचडे

स्त्रीचे स्वातंत्र्यपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लहानपणी वडील मुलीचा सांभाळ करत, तरुणपणी पती तर म्हातारपणी मुलगा स्त्रीचा सांभाळ करायचा. प्राचीन काळी अशीच स्त्रीची अवस्था होती. चूल आणि मुल यांच्या चाकोरीतून बाहेर पडायला तिला वर्षे लागलीत. वंदनीय सावित्रीबाईंनी स्वतः समाजाचा अपमान सहन करून शिक्षणाची दारे खुले करून दिली. आज परिणाम असा दिसतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी मजल मारली आहे.मग देशाच्या पंतप्रधान महिला, राष्ट्रपती महिला, लोकसभेच्या सभापती सुद्धा महिला, रेल्वे,बस,विमान या ठिकाणी सुद्धा महिलांच्या हातात स्टिअरिंग आहे.तळागाळातील महिलांना सुशिक्षित करून स्वावलंबी,आत्मनिर्भर बनवण्याच्या अनेक पुढारी महिलांचे योगदान आपण विसरू शकत नाही. आकाशात झेप घेणारी कल्पना चावला तर सुवर्ण कन्या म्हणून ओळखली जाणारी धावपटू पी. टी.उषा, आयपीएस अधिकारी किरण बेदी इत्यादी बहाद्दूर महिला आपल्या नजरेसमोर उभे राहतात.

स्त्रियांमध्ये जिद्द,चिकाटी व मेहनत करण्याची क्षमता असेल तर आपले नावलौकीक केल्याशिवाय राहत नाही.स्त्री म्हणजे वात्सल्याचा शिखर, सुक्तगुणांची खाण म्हणून तिला कधी कमी लेखू नये. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही पाहिजे त्या प्रमाणात बदलला नाही. असे मी म्हणेन कारण स्त्री शिकलेली असते.त्यातही नोकरदार वर्गातील कमावती असेल तर बरेच वेळा तिला स्वतःच्या घरातूनच अपमान सहन करावा लागतो.

हॉटेलमध्ये जेवण करायला जातो तेव्हा वेटरने चांगली सर्व्हिस दिली म्हणून आपण त्याला पैशाची टीप देतो.पण गृहिणींनी मनापासून आपल्या आवडीचे पदार्थ अगदी वेळेवर दिले तरी आपण तिला काय ते देतो…तर…त्या पदार्थाला नाव ठेवतो.तीच्या मेहनतीची किंमत शून्य करून टाकतो. तिला टीप म्हणून पैसे नको तर फक्त दोन शब्द प्रेमाचे,स्तुतीचे हवे असतात पण आपण तेही देऊ शकत नाही.बरेचदा जेवणामध्ये मीठ किंवा तिखट कमीजास्त होते.अशावेळी घरची मंडळी तिला उतरून बोलतात.वेळप्रसंगी मोठे भांडण होते.यावेळी तिला समजून घेतले पाहिजे.कदाचित भाजीत मीठ टाकायला विसरली असेल.नाहीतर कोणत्या कामात राहिली असेल किंवा तिला बरं वाटत नसेल.कारण शोधण्यापेक्षा टीका करून माणूस मोकळा होतो.बिचारी आपले दुःख,गाऱ्हाणे चव्हाट्यावर न आणता शेवटपर्यंत कुढत बसते.

आठ मार्च हा दिवस साजरा करण्यामागे इतिहास आहे.1908साली अमेरिकेत अनेक महिला आपल्या हक्कासाठी सहभागी झाले होते. यात नोकरी करणाऱ्या महिलांची आपले कामाचे तास कमी करण्याचे,आपल्या पगारात वाढ करण्याची मागणी होती. यासोबतच महिलांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली होती.त्यांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचला.त्यानंतर एका वर्षानंतर अमेरिकेचे सोशॅलिस्ट पार्टीने हा दिवस साजरा करण्याची सूचना केली.हा दिवस पहिल्यांदा फेब्रुवारी 1909रोजी न्यूयॉर्क शहरात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुष यांच्यात समानता निर्माण होणे होय.

आजची स्त्री ही अबला नसून सबला आहे.पण ती सुरक्षित नाही.स्त्री स्वातंत्र्याच्या कितीही भोंगा वाजवला तरी ती कुठेतरी दबावात असते.हुंडाबळी,भ्रूणहत्या, अत्याचार, भेदाभेद,तिरस्कार, लैंगिक शोषण इत्यादींची ती बळी ठरते.भीतीपोटी ती पुढे जाण्यास धजावत नाही.तिचे पंख छाटण्या चे काम ‘ती’च (दुसरी स्त्री)करत असते.पण तिला हिमतीने समोर जावेच लागेल.शक्ती प्रदर्शन करावेच लागेल. शेवटी एवढेच म्हणेन, “कोमल हैं कमजोर नही तू, शक्ती का नाम नारी हैं, जग को जीवन देनेवली मौत भी तुझसे हारी हैं’!” ऊठ नारी,हाती शस्त्र घे.आकाशात ऊंच उंच भरारी घे.दाखवून दे जगाला तुझी ताकद.तुझ्या जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.तुझी ओळख जगाला होऊ दे.तेव्हा कुठे थोडी फार स्त्री स्वतंत्र झाली असे म्हणता येईल.

सौ.वनिता महादेव लिचडे
त.पवनी, जि. भंडारा
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles