चाहूल होळीची- पळस; कुसुमलता वाकडे

चाहूल होळीची – पळस



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जणू काही चाहूल भासती
ऋतू शिशिर आगमनाची
येताच मार्च महिना नुसती
पडझड सुरू होई झाडाची

रानात सुरू होई बघा पानगळ
उदास झाडे बिचारी जशी बापडी
पण ताट एकटा पळस उभा तळ
खंबीर केशरी फुले हसत पाकळी

होळीत पळस म्हणती उधळा मज
करा या केशरी फुलांचा सुंदर रंग
त्वचेला ना होई कसला परिणाम
तुम्ही खेळा होऊन मस्तीत दंग

सकाळी स्वच्छंद थवा पक्ष्यांचा
येती पाखरे भिरभिरत भेटाया
मधुरस फुलांतील चविष्ट चाखाया
सज्ज पळस त्यांना देती वाटाया

बिया डिंक, पाने फुले
ठेवा औषधांचा गुणी
लाख मोलाचा पळस
सखा असे सर्व बहुगुणी

कुसुमलता वाकडे
दिघोरी रोड,नागपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles