गटबाजी; बळवंत डावकरे

गटबाजी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

एकजुटीला लावी ग्रहण
गटबाजीलाही खतपाणी
पोळी आपली घेती भाजून
मतलबी धूर्त हे राजकारणी

नैतिकतेला फासून हरताळ
कोलांटउडी पक्षांतराची
दलबदलू बेगडी नेत्यांना
नसे लाज जनाची न मनाची

धवल कपड्यांची झूल अंगावर
आतून न्याराच कावेबाजपणा
गोष्टी ठोकती विकासाच्या
प्रत्यक्षात नुसता खोटारडेपणा

एकजुट होता या जनतेची
पोटशूळ नेत्यांचे मग उठते
दुफळी माजवती समाजात
गटबाजीचे स्तोम माजवते

नका मर्दांनों ही गटबाजी
घ्या ओळखून यांचा कावा
गुण्यागोविंदाने नांदू आपण
आपुलकीचा स्नेहबंध जपावा

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles