कालची आणि आजची रंगपंचमी; अॕड.पल्लवी पाटील

कालची आणि आजची रंगपंचमीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भारतात पूर्वी ‘धुलिवंदन’ साजरी करण्याची एक पद्धत होती. ती म्हणजे होळी जळून झाल्यानंतर जी राख असायची त्या राखेचे किंवा ते भस्म आपल्या शरीराला लावायचे आणि त्यानंतर स्नान करायचे. म्हणजे आपण त्या धुळीला वंदन केले. ती धूळ जी पवित्र आहे. तिच्या पुढे आपण नतमस्तक झालो. तसेच घरातील स्त्रिया पाण्याने भरलेला हंडा होळीच्या राखेवरती ठेवायच्या. त्या पाण्यामध्ये सूर्यप्रकाश पडायचा व ते गरम पाणी जे सूर्यप्रकाशात ठेवलेले होते. त्यांनी लहान मुलांना आंघोळ घातली जायची. यामुळे त्या मुलांना उन्हाळा लागत नाही अशी समज होती.
अजून काही उदाहरणे द्यायची झाली, तर पूर्वी श्रीकृष्ण आणि राधा यांची देखील होळी आपल्याला ऐकण्यात आली असेलच. जिथे नैसर्गिक रंगापासून किंवा फुलांपासून तयार केलेल्या रंगांपासून होळी खेळली जायची. एकमेकांवरती फुलांची उधळण केली जायची आणि अशा पद्धतीने कुठचीही इजा न होता होळीचा/ धुलिवंदनचा/ रंगपंचमीचा आस्वाद घेतला जायचा तर ह्या होत्या आपल्या प्राचीन पद्धती, प्राचीन रीतीरीवाज. ज्याने धुलीवंदन साजरी व्हायचे.

पण हल्लीचे धुलीवंदनाचे स्वरूप पाहता रेन डान्स आयोजित केला जातो. काही ठिकाणी वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जिथे नाच व काही गेम्स वगैरे ठेवले जातात. सोसायटीमधील लहान मुले स्वतःला वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगवून घेतात. अक्षरशा ओळखता देखील येत नाहीत. सकाळपासून दुपारपर्यंत रंगपंचमीचा आस्वाद घेतला जातो. रंगीत फुगे, रंगीत पिचकारी, इतर रंगीत पाणी यांच्या वापर या धुलिवंदनात हमखास होतो. सफेद रंगाचे कपडे घालून ते अजून रंगीत करून टाकायचे ही एक नवीन संकल्पना या धुलीवंदनात दिसून येते. वेगवेगळे खायचे पदार्थ देखील ठेवलेले असतात. तर असे हे आजच्या पिढीचे धुलीवंदन किंवा रंगपंचमी.

ऐड पल्लवी पाटील, नागपूर
==============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles