आनंद; वसुधा नाईक

आनंदपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘आनंद’ ही अनुभूती आहे. जी प्रत्येक मानवात, सजीवात मनाच्या कुपीत दडलेली आहे. ती एक अभिव्यक्ती आहे. मी सजीव म्हटलं याचं कारण, वृक्षवेली याही सजीव आहेत. तर यांनाही वार्‍यासंगे डोलताना, लहरताना, नृत्यात मग्न होताना आपण पाहतो. ही अभिव्यक्ती आपल्याला समजून घ्यावी लागते. मानव हा निसर्ग, कुटुंब समाजात रमणारा प्राणी आहे. मानव आनंद ही अभिव्यक्ती अगदी छोट्या छोट्या कारणातून व्यक्त करत असतो.व्यक्त होतो.

शिक्षकांनी छान हा शाबासकीचा शब्द मुलांना वापरताच मुले आनंदी होतात. मुलांच्या अक्षराला एखादा ‘स्टार’ दिला तरी आनंद होतो. खेळताना जिंकले की होणारा आनंद तर अवर्णनीय आहे. नोकरी मिळणारा आनंद, ती कायम झाली म्हणून मिळणारा आनंद, प्रमोशन झाले म्हणून मिळणारा आनंद. मित्रांना पार्टी देताना होणारा आनंद, त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून होणारा आनंद….असे किती किती सांगू बर!! लहान मुलाची झालेली प्रत्येक पहिली क्रिया मनाच्या एका कोपर्‍यात साठवली जाते. ती परत परत जागेपणी स्वप्नात अनुभूती घेताना होणारा आनंद शब्दात सांगताच येणार नाही.

आई होताना झालेला त्रास …पण आपल्या बाळाला पाहताच क्षणात त्रास विसरून झालेला तो नयनात दिसणारा आनंद…अवर्णनीय अगदी! वृद्धांना तर त्यांच्याशी नुसते कोणी बोलले तरी, तो आनंद त्यांच्या चेहर्‍यावर झळकत असतो. कारण त्यांच्याशी बोलायला हल्ली वेळ नसतो न या पिढीला…!! अशी आनंदाची अगणित उदाहरणे देता येतील. अगदी सिग्नलला गाडीपुसून दिल्यावर गाडीच्या मालकाने मुलाला दिलेली एक दहाची नोटही त्याच्या जीवनात आनंद आणते. गरीबाघरी रोज व्यवस्थित खायला मिळाले तरी तो आनंदात असतो. ‘आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा’. जसा सुगंध वार्‍याच्या दिशेला वाहत जातो. तसे आनंद हा जीवनाचा सुगंधासमान वार्‍यावर पसरत जावा.तो सर्वांना घेता यावा. आनंद द्यावा अन् घ्यावा…!!

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
(लेखिका प्रसिद्ध कवयित्री व शिक्षिका आहेत)
==============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles