राज्यसभेसाठी खेळी:भाजपने राज्यसभेचा तिसरा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा

राज्यसभेसाठी खेळी:भाजपने राज्यसभेचा तिसरा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मविआचे नेते देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट_

मुंबई: राज्यसभेच्या जागांबाबत महाविकास आघाडीचे नेते आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सागर बंगला येथे आज ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई हे फडणवीसांची भेट घेणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपने राज्यसभेसाठीचा तिसरा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीतील नेते भेट घेणार आहेत. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस देखील आहे. या मुद्यावरुन ही भेट होण्याची शक्यता आहे.

भाजपकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी एक तर शिवसेनेने दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भाजपच्या तिसऱ्या उमेदवारामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारासाठी ही धोक्याची घंटा आहे. राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत आहे. दरम्यान आजच महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत. या भेटीमध्ये राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होणार आहेत.

या बैठकीत सहाव्या जागेचे भवितव्य ठरणार आहे. या निवडणुकीत आवश्यक तितकी मते राष्ट्रवादी, शिवसेनेकडे आहेत. पण जर भाजपाने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला तर मात्र ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles