दादासाहेब बालपांडे फार्मसी महाविद्यालयात पुस्तक विमोचन सोहळा संपन्न

दादासाहेब बालपांडे फार्मसी महाविद्यालयात पुस्तक विमोचन सोहळा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: बेसा येथील दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील प्रा. डॉ. निलेश महाजन तसेच इतर प्रा.डॉ.अवनीत सैनी, डॉ. निशिकांत राऊत, डॉ.संजय ढोबळे यांच्या द्वारे लिखित “Photophysics And Nanophysics in Therapeutics” या पुस्तकाचे प्रकाशन आंतराष्ट्रीय प्रकाशन संस्था “Elsevier” यांनी केले आहे.

त्या निमित्ताने दि.६ जून २०२२ रोजी सदर पुस्तकाचे प्रकाशन व विमोचन सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. संजय दुधे व डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, रा.तू.म. नागपूर विद्यापीठ हे उपस्थित होते.

या कार्यक्रमातील उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन व विमोचन करण्यात आले. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी आपल्या भाषणात या पुस्तकाच्या लेखकांचे अभिनंदन केले व महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे महत्व व संशोधन क्षेत्रात मिळणाऱ्या संधी बाबत त्यांचे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. उज्वला महाजन यांनी कॉलेजचा चढता आलेख मांडला तर प्राध्यापक डॉ. विद्या साबळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन दुमोरे यांनी आभार प्रदर्शन केले.

या पुस्तक प्रकाशन आणि विमोचन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थाप्रमुख मनोज बालपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. उज्वला महाजन, प्रा.डॉ.निलेश महाजन, डॉ.अमोल वरोकर, डॉ. पुरुषोत्तम गणगणे, सचिन मोरे, सचिन मेंढी, कु. विजयश्री रोकडे, सौ. मोनाली दुमोरे, कु. रोहिणी खरवडे, डॉ. देवेश्री नांदुरकर, कु.अश्विनी इंगोले, व इतर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles