
‘कुत्ते की मौत मरेगा’; नागपुरात कॉंग्रेस नेत्यांची जीभ घसरली
_शेख हुसेन यांची पंतप्रधान मोदीवर जहरी टीका_
नागपूर: बहुचर्चित नॅशनल हेराल्ड केस प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांची चौकशी सुरु आहे. नागपुरात ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं. या आंदोलनावेळी बोलताना शेख हुसेन यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. शेख हुसेन म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी तेरा वही हाल होगा, जैसे कुत्ते की मौत होती है, ऐसे नरेंद्र मोदी की मौत होगी’. भले यासाठी मला हजार नोटीस मिळतील. मला त्याची चिंता नाही.
आम्ही लढत आलो आहोत आणि पुढेही लढत राहू. शेख हुसेन यांनी मोदींवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हुसेन यांच्या या टीकेवर भाजप नेत्यांनी तीव्र विरोध केलाय. या वक्तव्यावर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. भाजपने हुसेन यांच्या अटकेची मागणी केलीय. तसंच त्यांना अटक झाली नाही तर भाजपने आंदोलनाचा इशारा दिलाय.
त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. देशात विविध राज्यात काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात येतेय. अशा स्थितीत आता काँग्रेस नेत्यांचा तोल गेल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी नागपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी मोदींवर जहरी टीका केलीय. तिकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही मोदींवर जोरदार टीका केलीय.
*भुपेश बघेल यांचा मोदींवर हल्लाबोल*
काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय. आम्ही आता आमचे कर्मचारी AICC कार्यालयही घेऊन येऊ शकत नाही. फक्त दोन मुख्यमंत्रीच इथे येऊ शकतात, अन्य कुणाला प्रवेश नाही असं आम्हाला सांगण्यात आलंय. त्यांनी राहुल गांधींच्या जबड्यात हात घालण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना हे महागात पडेल, असा इशारा बघेल यांनी दिला आहे.