विरेंद्र गणवीर लिखित “थेंब- थेंब श्वास” नाटकास द्वितीय पारितोषिकासह सात पुरस्कार

वीरेंद्र गणवीर लिखित “थेंब- थेंब श्वास” नाटकास द्वितीय पारितोषिकासह सात पुरस्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतीक कार्य संचालनालय , मुंबई आयोजीत 18 व्या राज्य बालनाटय स्पर्धेत बहुजन रंगभूमीचे सहकार्य असलेल्या, अश्वघोष कला अकादमी , नागपूर ने सादर केलेल्या वीरेंद्र गणवीर लिखीत ” थेंब- थेंब श्वास ” नाटकाला निर्मितीच्या दुस-या पारितोषिकासह एकूण सात पुरस्कार प्राप्त झाले असून वैदर्भीय रंगभूमीवर नवा इतिहास निर्माण केलेला आहे.

नुकत्याच सोलापूर येथील हुतात्मा नाटय मंदिर येथे चार दिवस या स्पर्धा भरगच्च प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडल्या. आज पर्यंत ” नगं रं बाबा शाळा” , ” घायाळ पाखरा ” , “रिमांड होम” , “आम्हालाही पंख हवेत” , “थेंब – थेंब श्वास” या सुप्रसिध्द बालनाट्यांनी अंतिम स्पर्धेत बाजी मारलेली होती.

या स्पर्धेत “थेंब- थेंब श्वास ” नाटकाच्या लेखना करिता दुसरे पारितोषिक वीरेंद्र गणवीर , दिग्दर्शन द्वितीय रिशील ढोबळे , नैपथ प्रथम श्रेयश अतकर , प्रकाशयोजना प्रथम देवदत्त सिध्दाम यांना तर अभिनयाचे रौप्यपदक दिपांशी मुरमाळे तसेच अभिनय प्रमाणपत्र वृशाली सहारे आणि नाटकाने निर्मितीचे द्वितीय पारीतोषिक पटकावून इतिहासाच्या सुवर्णपानावर आपली मोहोर उमटविलेली आहे.

नाटकात देव नन्नावरे , उन्नती गव्हाने, जिशांत मुरमाळे यांनी भुमीका केल्या असुन अस्मिता पाटील , शिवम म्हैस्के ,उत्कर्ष तायडे , रोहीत साळवीकर , पल्लवी धाबडऺ, प्रियांक उके, संगीत- सौरभ कांबळे यांनी साहाय केले. बहुजन रंगभूमीच्या सर्व कलावंतांवर राज्यभरातून मोठया प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles