सरकारी कर्मचा-यांच्या पगारात येतील तब्बल दोन लाख ‘एक्स्ट्रा’

सरकारी कर्मचा-यांच्या पगारात येतील तब्बल दोन लाख ‘एक्स्ट्रा’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली: सातव्या वेतन आयोगाची थकबाकी असलेल्या डीए व एरियसबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याचे ठरविले असून, केंद्रातील सरकारी कर्मचारी 18 महिन्यांच्या डीए एरियरची (DA Arrears) मोठ्या कालावधीपासून प्रतीक्षा करत आहेत. एका अहवालानुसार सरकार एकाचवेळी 2 लाख रूपयांपर्यंत कर्मचार्‍यांना देण्याची योजना आखत आहे. कर्मचारी सातत्याने जानेवारी 2020 पासून 2021 पर्यंत रोखलेल्या डीएची मागणी करत आहेत.

*डीए एरियरवर सरकार करत आहे विचार*

सरकारी कर्मचार्‍यांना अपेक्षा आहे की, डीए एरियर देण्याबाबत सरकार विचार करेल. नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे सचिव, स्टाफ स्टाईड, शिवगोपाल मिश्रा सुद्धा मोठ्या कालावधीपासून डीए एरियरची मागणी करत आहेत.

*इतका मिळेल डीए एरियर*
लेव्हल 1 च्या कर्मचार्‍यांचा डीए एरियर 11,880 रूपयांपासून 37000 रूपयांच्या दरम्यान असेल. तर, लेव्हल 13 च्या कर्मचार्‍यांना 1,44,200 रूपयांपासून 2,18,200 रूपये डीए एरियर म्हणून मिळेल. सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए दिला जातो. हा कर्मचार्‍यांना त्यांच्या राहण्याच्या खर्चात मदत करण्यासाठी दिला जातो.

*एकाचवेळी येतील सॅलरीत पैसे*
अर्थ मंत्रालय, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आणि खर्च विभागाच्या अधिकार्‍यांसोबत संयुक्त सल्लागार तंत्रज्ञान यांची बैठक होईल. यामध्ये डीए एरियरच्या एकरक्कमी पेमेंटवर चर्चा होणार आहे. असे वृत्त आहे की, सरकार कर्मचार्‍यांना डीए एरियर म्हणून 2 लाख रूपये एकाचवेळी देऊ शकते. डीए एरियर कर्मचार्‍यांच्या लेव्हलवर अवलंबून असतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles