उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा सायंकाळपर्यंत राजीनामा देणार

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा सायंकाळपर्यंत राजीनामा देणार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: महाविकास आघाडी सरकार अवघ्या अडीच वर्षातच संपुष्टात आले आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा सांयकाळ पर्यंत राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता वर्तवली जात असून शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करून संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिले आहेत. ‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने’ असे त्यांनी ट्विट केले आहे.

*शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत*

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आसाममधील गुवाहाटीमध्ये 40 बंडखोर आमदार उपस्थित आहेत. सर्व आमदार बुधवारी पहाटे सुरतहून चार्टर्ड विमानाने गुवाहाटीला पोहोचले होते. महाराष्ट्राच्या आमदारांना विमानतळावरून पोलीस संरक्षणात बसमधून एका आलिशान हॉटेलमध्ये नेण्यात आले. दरम्यान बंडखोर आमदार प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी कॉंग्रेसचेही काही आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचे बोलले असून शिंदे गटाचे संख्याबळ अजून वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles