
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा शासकीय दर्जा व पेन्शनसाठी संघर्ष
नागपूर : अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने 28 जून राजी सकाळी 11 वाजता गुरुदेव सेवाश्रम, आग्याराम देवी चौक येथे नागपूर विभागातील सेविका व मदतनीसांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी संघटनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा अॅड. निशाताई शिवुरकर, सरचटिणीस कमलताई परुळेकर, कार्याध्यक्ष किसनाबाई भानारकर, सुजाता भोंगाडे आदी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) नागपूर च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत अँड. निशाताई शिवुरकर, उज्वलाताई नारनवरे, मायाताई ढाकणे, कमलताई परुळेकर, व मनीषा मुनघाटे आणि विलासराव भोंगाडे यांनी दिली.
महाराष्ट्रात एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत 1,86,800 कर्मचारी काम करतात. केंद्र व राज्यशासनाच्या महिला व बाल कल्याणासाठी असलेल्या योजनांची अमलबजावणी या महिला कर्मचारी करतात. कुपोषण, निर्मूलन, बालकांचे व महिलांचे आरोग्य, लसीकरण, बालकांचे शिक्षण अशा अनेक महत्वाच्या विषयांवर या स्त्रिया कार्य करतात. कोरोना काळात देखील जीवाची पर्वा न करता या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता व आरोग्याचे काम केले आहे. त्या खऱ्या “कोरोना योध्दा” आहेत.
या कर्मचाऱ्यांना अल्प मानधनावर काम करवे लागते. शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा नाही. अंगणवाडी कर्मचारी सभा 1985 पासून या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करते आहे. संघटनेच्या प्रयत्नांमुळे मानधन वाढ, सेवा, शर्ती, मदतनीसांना सेविकापदी तर सेविकांना मुख्य सेविकापदी तर बढती एकरकमी सेवानिवृत्ती लाभ, उन्हाळी व दिवाळी सुट्टया अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत.
सद्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची महत्वाची मागणी शासकीय सेवेचा दर्जा आणि अर्ध्या मानधनासाठी इतकी दरमहा पेन्शन ही आहे. त्यासाठी 20 जुन ते 25 जुन अशी यवतमाळ ते अमरावती पदयात्रा संघटनेने आयोजीत केली होती. महिला बाल कल्याण मात्री यशोमती ठाकुर यांना दि. 17/06/2022 रोजी मानधन वाढीचे आणि अर्ध्या मानधन इतक्या पेन्शन या प्रस्तावाचे आश्वासन दिल्यामळे पदयात्रा स्थगित करण्यात आली आहे.