
येत्या शैक्षणिक वर्षापासून सीईटींची संख्या घटवणार
_बारावी-सीईटी गुणांना 50 टक्के वेटेज, 10 दिवसांत निकाल लावणार_
येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२३-२४) राज्यातील पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावी आणि सीईटीच्या प्रत्येकी ५० टक्के गुणांचा विचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सीईटींची संख्या कमी करून, प्रवेश प्रक्रिया १ जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
या वेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने उपस्थित होते. सामंत म्हणाले, २०१२ मध्ये या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्याचप्रमाणे सीईटींची संख्या कमी करण्यात येईल. जेईई मेनची परीक्षा दोन टप्प्यांत होते. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांना गुण स्कोअर करण्याची संधी मिळण्यासाठी पुन्हा
सामंतांचा पाटील यांना टोला
यूपीएससीच्या अंतिम निकालात महाराष्ट्रातून ६० वर उमेदवार उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. महिला सर्वच क्षेत्रांत अग्रेसर राहू शकतात हे गेल्या दोन-तीन दिवसांमध्येच दिसले. या कामगिरीमुळे महिलांवर टिप्पणी करणाऱ्या काही लोकांच्या डोळ्यात अंजन गेले आहे, असा टोला सामंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना लगावला.
*सीए अभ्यासक्रम ४८ ऐवजी ४२ महिन्यांचा, आर्टिकलशिप २ वर्षे*
सीए अभ्यासक्रम आता ४८ महिन्यांऐवजी ४२ महिन्यांचा होऊ शकतो. सोबतच आर्टिकलशिपचा कालावधी ३ ऐवजी २ वर्षे होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीजने सीए अभ्यासक्रमात बदलाचा मसुदा तयार केला आहे. यामध्ये आर्टिकलशिपचा कालावधी कमी करण्यासह अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांचा समावेश आहे.
आतापर्यंत आर्टिकलशिप तीन वर्षांची होती. यात १५६ सुट्यांचा समावेश आहे. म्हणजेच आर्टिकलशिपचा कालावधी अडीच वर्षांचा होता. नव्या बदलानुसार २४ सुट्या असतील. दोन वर्षांची आर्टिकलशिप संपवण्याच्या ६ महिन्यांनंतर अंतिम परीक्षा देता येईल. याशिवाय सर्टिफिकेट अॉफ प्रॅक्टिससाठी (सीओपी) प्रॅक्टिसिंग एफसीए (फेलो चार्टर्ड अकाउंटंट) अंतर्गत एक वर्षाचा कामाचा अनुभव घ्यावा लागेल. यानंतरच प्रॅक्टिस करता येईल.