ढोंगी हिंदुत्ववादी ‘टोमणे सभेत’ ‘या’ प्रश्नांची उत्तरे देणार का? मनसेचा खोचक सवाल

ढोंगी हिंदुत्ववादी ‘टोमणे सभेत’ ‘या’ प्रश्नांची उत्तरे देणार का? मनसेचा खोचक सवाल



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

औरंगाबाद : मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा वर्धापनदिन येत्या ८ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. या जाहीर सभेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत खोचक सवाल उपस्थित केला आहे.

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी टि्वट करून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘या प्रश्नांची उत्तरे ढोंगी हिंदुत्ववादी मुख्यमंत्री ८ जूनच्या सभेत देतील का? असा खोचक सवाल काळे यांनी विचारला आहे. बाबरी मशीद पडली म्हणून मुस्लिम समाजाची माफी मागणाऱ्या मुलायमसिंह यादवांच्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमीसोबत सत्तेचा पाट का मांडला ?

संभाजीनगरला शिवसेनेचा विधानपरिषदेचा आमदार अंबादास दानवे एमआयएमच्या नगरसेवकांची मदत घेऊन का करावा लागला? याचे उत्तर संभाजीनगरच्या ८ जून ला होणाऱ्या ‘टोमणे सभेत’ ढोंगी हिंदुत्ववादी देणार का? असा खोचक सवाल काळे यांनी टि्वटच्या माध्यमातून विचारला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles