“सगळेच दाढीवाले धर्मवीर आनंद दीघे नसतात, काही गद्दार एकनाथ शिंदे देखील असतात”

“सगळेच दाढीवाले धर्मवीर आनंद दीघे नसतात, काही गद्दार एकनाथ शिंदे देखील असतात”



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सोशल मिडीयावर नेटक-यांचा शिंदेना विरोध_

मुंबई: देशात इलेक्ट्रानिक, प्रिंट मिडीया पेक्षा सोशल मिडीया सर्वात प्रभावशाली ठरतो आहे. राज्यातील सोशल मिडीयावर सक्रीय असलेल्या नेटक-यांनी राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाज माध्यमावर विरोध दर्शवत आपल्या प्रतिक्रीया दिल्यात.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ‘CMO MAHARASTRA’ या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत फेसबूक खात्यावरून एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी यावर प्रतिक्रिया देत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तर काहीनी अनफॉलो करत निषेध व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्याच्या अधिकृत फेसबुक संबंधित पोस्टला आतापर्यंत १६ हजाराहून अधिक लाइक्स मिळाले असून जवळपास तीन हजार प्रतिक्रिया आल्या आहेत. यातील बहुतांशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील आहेत. अनेकांनी त्यांना ‘गद्दार’ म्हटलं असून, ‘अनाजी पंत’ या इतिहासातील व्यक्तीशी तुलना केली आहे. ‘आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री मानत नाही, आम्ही उद्धव ठाकरेंचेच समर्थक आहोत,” अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया संबंधित पोस्टवर आहेत.

“लांडग्याला वाघाचं कातडं पांघरलं म्हणजे तो वाघ होत नाही”, “सगळेच दाढीवाले धर्मवीर आनंद दीघे नसतात, काही गद्दार एकनाथ शिंदे देखील असतात”, “हिंदुहृदय सम्राटाच्या मुलाला पायउतार करून काय मिळवलं,” असा सवाल देखील काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. याशिवाय काहींनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन देखील केलं आहे. तर काहींनी फडणवीस यांच्यापासून सावध राहण्याचा सल्लाही दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles