
दुबार पेरणीचे संकट, रायमोहा परिसरातील शेतकरी हवालदिल; गोकुळ सानप
रायमोहा: शिरूर कासार तालुक्यात मागील आठ दिवसांपासून अधूनमधून येणारा हलकसा पाऊसही सूसाट वा-याने गायब होत आहे येणाऱ्या दोन तीन दिवसात पाऊस नाही झाला तर रायमोहा परिसरातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट येते की काय? या चिंतेत रायमोहा परिसरातील शेतकरी असल्याचे अँड सर्जेराव तात्या तांदळे युवा मंचचे अध्यक्ष गोकुळ सानप रायमोहाकर यांनी म्हटले आहे.
रायमोहा परिसरातील शेतकऱ्यांनी अल्प ओलीवर पेरणीची कामे केली आहेत झालेल्या पेरणीनंतर अधून-मधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने या पाऊसावरच पिकांची उगवण झाली आहे. परंतु गेल्या दहा दिवसांपासून दिवसभर पाऊसाचे वातावरण तयार होते परंतु सुसाट वा-याने ढग गायब होतात त्यामुळे पाऊस पडतच नाही जमिनीतील ओल पाऊसा अभावी संपल्याने रायमोहा परिसरातील पिके सुकू लागली आहेत रायमोहा परिसरात पावसाळा सुरू झाल्यापासून एकही दमदार पाऊस झाला नसल्याने शेताच्या बाहेर पाणीच न आल्याने नदी, नाल्याला पाणी लोटलेले नाही त्यामुळे अजूनही विहीरी कोरड्याच असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी सुध्दा शेतीला पाणी कसे देतील जून या महिन्यात एक वेळेस दमदार पाऊस झाला होता या पडलेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी कापूस, उडीद, तुर, बाजरी, सोयाबीन, पेरणी केली आहे तर काही प्रमाणात कापसाची लागवड केली आहे पेरणी झाल्यानंतर कधी तरी अधून- मधून पाऊसाच्या बारीक सरी दाखल होत आहेत. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होते परंतु सुसाट वा-याने पाऊस गायब होत आहे तर या सुटणा-या सुसाट वा-यामुळे ओलही उडत आहे तसेच पडणारे कडक उन यामुळे कोवळी पिके कोजमली जात आहेत ज्या भागात पाऊस नव्हता त्या भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांची पेरणी सुरू आह.