
ग्रेट स्कॉलर्स पब्लिक स्कूल येथे कारगिल दिवस साजरा
सतीश भालेराव, नागपूर
हिंगणा : ग्रेट स्कॉलर्स पब्लिक स्कूलच्या लहान लहान चिमुकल्यांनी सैनिकांच्या वेशभूषा करून कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली व कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाला विचारात घेऊन १९९९ मध्ये दिनांक ३ मे १९९९ ते २६ जुलै १९९९ असे एकूण दोन महिने, तीन आठवडे, दोन दिवस जे कारगिलचे युद्ध चालले, व या युद्धात आपल्या देशाचे ५२७ जवान ठार झाले. व १३६३ जवान जखमी झाले, तर एक योद्धा कैदी झाला. या सर्वांच्या बलिदानाचा एक मानवंदना म्हणून त्यांच्या बलिदानाचे जय जय घोष करत “भारत माता की जय, वंदे मातरम” अशी जय जय घोष करत प्रभात फेरी काढण्यात आली.
ग्रेट स्कॉलर्स पब्लिक स्कूलच्या लहान लहान चिमुकल्यांनी सैनिकांच्या वेशभूषेत “भारत मातेचा जयघोष करत” नागरिकांना सैनिकांच्या बलिदानाची एक आठवण म्हणून २६ जुलै रोजी जनजागृती केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महेश लोखंडे, विशाल भोसले, गजेंद्र खोबे, वानाडोंगरी नगरपरिषदेचे नगरसेवक आनंद धडांगे,नितीन साखळे, रेखाताई बडोदेकर, निलडोहच्या सरपंच वनिताताई गडमळे, ग्राम पंचायत सदस्य उर्मिलाताई गायधने, सुभाष खडेकार, ओमप्रकाश वैद्य, अश्विनी माटे, हिना रिहल, वर्षा खोब्रागडे, प्रतीक्षा राऊत, आरती चौरे, नेहा बोपचे, अनिता टेंबरे व शाळेचे संचालक कमलेश खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.