ॲम्बुलन्सला साईट द्या, रॅलीला सबनीसाची हिरवी झेंडी

ॲम्बुलन्सला साईट द्या, रॅलीला सबनीसाची हिरवी झेंडी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_युवा एक शांती एक क्रांती फाऊंडेशन तर्फे एम्बुलेंस ला साईड द्या , या रॅलीचे आयोजन_

नागपूर: स्वातंत्र्याच्या ७५ व्या आझादी अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य दिना निमित्य एम्बुलेंस ला साईड द्या अशा रॅलीचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. रॅलीची सुरुवात भारत मातेच्या व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला माल्यार्पण व वंदन करुन करण्यात आली. रॅलीमधे प्रमुख पाहुणे म्हणुन अंबाझरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर व सिताबर्डी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस प्रामुख्याने उपस्तिथ होते.

रॅलीची सुरुवात गांधीनगर स्टेकिंग ग्राउंड येथुन होऊन ही रॅली LAD कॉलेज चौक, अभ्यंकर नगर चौक, माटे चौक, स्वामी विवेकानंद स्मारक अंबाझरी, अंबाझरी गार्डन, कैम्पस चौक, फुटाला बिरसा मुंडा पुतळा चौक, रवीनगर चौक, रामनगर चौक, हिल रोड, शंकरनगर पासुन या रॅलीचे समापन गांधीनगर स्टेकिंग ग्राउंड येथे करण्यात आले.

रॅलीचा उद्देश हा होता की, कोणत्याही बांधवांच्या कुटुंबातील व्यक्ति एम्बुलेंस मधे असल्यास रस्त्यावरिल होणारी वाहतुक कोंडी झाल्यास काही मिनिटाच्या अभावामुळे जीव गमावावा लागतो. नागरीकामधे जनजागृती व्हावी या करिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली यशस्वी करण्यासाठी युवा एक शांती एक क्रांती फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतलेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles