१५० चे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता मैदनात उतरवा; अमित शहा

१५० चे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता मैदनात उतरवा; अमित शहापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_धोका देणा-या उद्धव ठाकरेंना जमीन दाखवाच_

मुंबई: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेवर जोरदार घणाघात केला आहे. मुंबई महापालिकेत १५० चे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता मैदनात उतरवा असेही शाह यांनी सांगितले. फक्त २ जागांसाठी शिवसेनेने २०१४ ला युती तोडली असं म्हणत त्यांनी निशाणा साधत उद्धव ठाकरेंनीच भाजपला धोका दिल्याचे शाह म्हणाले. मुंबईत भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केले.

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला आहे. राजकारणात सगळं काही सहन करा परंतु धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. धोका देणारा कधीच मजबूत होत नाही. मी कधीच शिवसेनेला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता. असेही शाह म्हणाले.

भाजपने कधीच छोटा भाऊ मोठा भाऊ केलं नाही पण शिवसेनेने मात्र फक्त २ जागांसाठी युती तोडली असं अमित शाह म्हणाले. मुंबईच्या राजकारणात फक्त भाजपचे वर्चस्व हवं, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरलं पाहिजे असं आवाहन अमित शहांनी नेत्यांना केलं. अमित शाह यांच्या आक्रमक भाषणानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शहा यांच्या टिकवर शिवसेनेचे नेते कस प्रत्युत्तर देतात हे आता पाहायला हवं.

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त मान हलवत राहिले*

देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत होते, त्यावेळी या दोघांत गुप्तगू झाली. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दोघेही उपस्थित होते. त्यानंतर बाहेर आल्यानंतर पुढचा दौऱ्यासाठी तयारी करताना अमित शहा त्यांच्या ताफ्यामधील कारजवळ आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सोबत होते. त्यावेळी दोघांमध्ये गुप्तगू झाली. आता दोघांमध्ये नेमकी कशावरुन चर्चा रंगली हे काही समोर आले नाही. पण मुख्यमंत्री शहा यांचे ऐकत होते व फक्त मान हलवत होकार देत होते. त्या दोघांच्या राजकीय चर्चांविषयी झालेल्या चर्चांना ऊत आला आहे. 20 जून 2022 रोजी पासून शिवसेनेतील 40 आमदारांची मोट बांधत शिंदे यांनी केले आणि आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपशी घरोबा करत त्यांनी नवीन सरकार स्थापन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles