भूस्खलन एक नैसर्गिक आपत्ती, मानवाला आत्मपरीक्षण करण्याची गरज’; विष्णू संकपाळ

भूस्खलन एक नैसर्गिक आपत्ती, मानवाला आत्मपरीक्षण करण्याची गरज’; विष्णू संकपाळपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*नैसर्गिक प्रकोपाची मरणलाट आली*
*उषःकाल होता होता काळरात्र झाली*

आणि पुन्हा एकदा “माळीण” च्या जखमावरची खपली निघाली. झोपेत असणारे गाव चिरनिद्रा घ्यायला जावे. इथेही एक गाव होते असे इतिहासाने म्हणावे.. चित्र पाहूनही काळीज गलबलून जावे. नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटे यावे. काय झाले सांगायलाही मागे कुणी न उरावे.. एखादे उरलेच तरी त्याने अश्वत्थाम्यासारखी ही चिरंतन जखम सोबत घेऊन कसे जगावे..? सगळेच उध्वस्त विश्व..!! भूवैज्ञानिक तज्ञ, संबंधित यंत्रणा आणि मानवी हव्यासापोटी निसर्गावर होणाऱ्या अतिक्रमणाला जबरदस्त चपराक देणारी ही घटना.

भूस्खलनाच्या घटनेत पाण्याची भूमिका फार महत्वपूर्ण ठरते. म्हणून अशा घटना पावसाळ्यात घडतात. पाण्याच्या दाबाने मातीच्या कणातील घर्षण कमी होऊन तेथे छिद्रिय बल निर्माण होते. परिणामी जमिनीची दाब झेलण्याची क्षमता घटते आणि भूस्खलन होते.

अनेक जीवांना कंठस्नान घालणारी ही घटना कल्पनातीत भिषण होतीच. मात्र केवळ निसर्ग प्रकोप म्हणून दुर्लक्ष करण्यासारखी अजिबात नाही. आज प्रचंड वाढणार्‍या लोकसंख्येला उपलब्ध नैसर्गिक संसाधने अपुरी पडताहेत आणि मग त्याच्या पूर्ततेसाठी माणूस निसर्गावर हल्ला करत आहे. निसर्ग अशा घटनांतून मानवाला सावध करण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय,मात्र मानवी बुद्धी जागेवर यायला तयार नाही. राजकीय इच्छाशक्ती तर प्रचंड उदासीन आहे. किंबहुना सत्तास्खलनातून सावरण्यासाठीच त्यांना वेळ मिळणे मुश्किल होतेय आजकाल असो..
शुक्रवारीय हायकू स्पर्धेसाठी, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर भूस्खलनाने कोसळलेल्या संकटाचे विदारक दर्शन घडविणारे चित्र समूह प्रमुख आदरणीय राहूल दादा यांनी देऊन, शिलेदारांच्या संवेदनशील कल्पकतेला हाक दिली.. अपेक्षेनुसार प्रतिसाद सुद्धा मिळालाच.

सतरा अक्षरे आणि तीन ओळीत कलाटणीसह परिणामकारक मांडणी करणे, हेच हायकूचे खरे आव्हान. घटनेचे वर्णन न करता चित्रापलिकडले काही तरी अदृश्य असते ते दृष्य स्वरूपात प्रकट करणे, मात्र हे करत असताना चित्रातील योग्य संदेश वाचकापर्यंत पोहचवणे हेच खरे कसब असते.. यासाठी हायकू चारोळीसारखा होऊ नये याची खबरदारी घेताना चित्राचा बारकाईने अभ्यास करूनच मांडणी करावी.. या काव्य प्रकारात अघळपघळपणाला वाव नसतो तर कल्पक भाव ओतणे महत्वाचे असते. हायकू वाचताक्षणीच, “वाह क्या बात” अशी उत्स्फूर्त दाद आली पाहिजे. घटनेचा कार्यकारणभाव, परिणाम, संभाव्य धोका अशा गोष्टींचे संमिश्रण हायकूत अंतर्भूत होणे आवश्यक असते.. त्यामूळे मोजकेच पण नेमके लिहिण्याचा प्रयत्न हायकूकारांनी करावा.

ऐक मानवा
कोप नव्हे हा धडा
काळाच्या हाका

मी या निमित्ताने अजून एका गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधू इच्छितो की, गेल्या अनेक दिवसांपासून असे निदर्शनास येते की बहुतेक विजेते स्पर्धेच्या निकालाची पोस्ट पहात नाहीत किंवा पाहिली तरी सन्मानपत्रासाठी फोटो पाठवत नाहीत.. निकाल पोस्ट दहा च्या आसपास येते आणि तीनवाजेपर्यंत पुरेसा वेळ असतोच.. समूह प्रमुख, परिक्षक, प्रशासक या सर्व गोष्टीवर खूप मेहनत घेत असतात.. स्वतःचे उद्योग व्यवसाय नोकरी सांभाळून समूहाचे काम करत असतात अशा वेळी प्रत्येक शिलेदाराने आपली नैतिक जबाबदारी सांभाळली पाहिजे.. आदरणीय दादा सातत्याने वेगवेगळे प्रयोग राबवत असतात त्याचा आपल्यालाच फायदा होत असतो..त्रिवेणी प्रकारात हळूहळू शिलेदार रूळताहेत याचा आनंद आहेच. नुकताच “शतकोत्तरी साहित्यगंध” या उपक्रमाची घोषणा केलेली आहे.. या सर्वांची आपण योग्य दखल घ्यावी हीच अपेक्षा. आणि सन्मानपत्राकडे कोणीही पाठ फिरवू नये..
आज हायकू परिक्षणीय मनोगत व्यक्त करण्याची संधी मला दिली. याबद्दल आदरणीय राहुलदादा यांचा मी आभारी आहे.🙏

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles