लातूर स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर छापेमारी
_सहा लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला जप्त_
लातूर: जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य धंद्यावर छापेमारी सुरू असून उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध धंद्यावर कारवाई करत देशी-विदेशी दारूची अवैध विक्रीसाठी एका कारमधून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होणार असल्याची मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तोंडारपाटी ते उदगीर जाणारे रोडवर सापळा लावून अवैध दारू वाहतूक करणारा गोविंद बनसोडे, यास दारूचा मुद्देमाल व स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 6 लाख 7 हजार रुपयाच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले आहे.