परतफेड
परतफेड माय करू कशी ?
मांडीची जिणे केली उशी
हातच्या फोडावाणी जपून
घास भरविला स्वतः खपून
परतफेड कशी करू बाबा ?
रात्रंदिवस रक्ताचं केलं पाणी
अडाणी असून शिक्षित केलं
सुखद क्षणांची ती अमृतवेल
कातडीचा केला जोडा जरी
परतफेड उपकारांची होईना
आठवणीविना जाईना क्षण
मायबाबाचे फेडू कसे ऋण ?
आदर्शाची नाळ का तोडू ?
वाट माणुसकीची का मोडू
आयुष्यभर चालेन वाटेनं
भिणार ना वादळी लाटेनं
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
======