तुझ्यासाठी कायपण..

तुझ्यासाठी कायपण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कधीही म्हणणार नाही मी तुझ्यासाठी कायपण,कायपण मन लावून ऐक माझे कारण, कारण
धरणीसाठी देह केला अर्पण, अर्पण
सुखासाठीच राबत होता माझा
आजोबा, आजोबा
शेतीमध्ये रात्रंदिन राबतो माझा बाप ,बाप
कपाळी लावून मातीचा टिळा, टिळा
खिळखिळा जीव झाला बापाचा ,बापाचा
मोबदला योग्य मिळत नाही घामाचा, घामाचा
म्हणूनच कधीही म्हणणार नाही मी
तुझ्यासाठी कायपण ,कायपण

बापासोबत माय माझी राबायची, राबायची
सर्दी,ताप दुखणे सदा अंगावरच काढायची,काढायची
उपाशी राहून आनंदाने मला पोटभर वाढायची,वाढायची
रूसल्यावर प्रेमानं घास भरवायची,भरवायची
माहेरच्या गोष्टी सांगून मला खुलवायची, खुलवायची
अंगणातील झोक्यावर खेळवायची,खेळवायची
म्हणूनच कधीही म्हणणार नाही मी
तुझ्यासाठी कायपण,कायपण

माय-बाप हेच माझे दैवत,दैवत
मायबापाच्या सेवेचे देऊ कसे वचन ,वचन
मायबापामुळेच पाहातोय सुंदर अशी सृष्टी ,सृष्टी
मायबापाच्या प्रेमामुळे होऊ नको तू कष्टी ,कष्टी
बायकोला सुखात ठेवण्याची माझ्याकडे आहे दृष्टी,दृष्टी
जीवनभर करेन तुझ्यावरही प्रेमाची वृष्टी ,वृष्टी
तरीही कधीही म्हणणार नाही…
तुझ्यासाठी कायपण ,कायपण

श्री.संग्राम कुमठेकर
मु.पो.कुमठा (बु.)
ता.अहमदपूर जि.लातूर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles