बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*आस एक श्वास*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

माझ्या दिनचर्याची
पहिली सुरवात तू
माझ्या कार्याला
उत्साह देणारा तू

माझ्या हदयातला
काळजाचा ठोका तू
निघणा-या प्रत्येक
श्वासातला श्वास तू

माझ्या सुखदुःखात
आस जागविणारा तू
न सा़ंगता मनातले भाव
ओळखणारा मनकवडा तू

माझ्या ओठी हास्य फुलविणारा
खळखळणारा झरा तू
मरगळलेल्या मनाला नवचैतन्य
देणारा खट्याळ वारा तू

माझ्या काळोख्या अंगणी
पेरणारा प्रकाश तू
माझ्या या अपुर्ण जीवाला
आकार देणारा तू

माझ्या या प्रवासाची
खरा साधक तू
अखेरपर्यंत हदयात बसणारा
माझा आस एक श्वास तू….

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🌸🔹♾️♾️♾️♾️
*आस एक श्वास*

आम्ही बहिण भाऊ
अतूट नातं रक्षाबंधन
सण नारळी पौर्णिमेचा
राखी घेतो हाताला बांधुन ॥

येणार न्यायला मला
माझा लाडका भाऊराया
माहेराला जाते मी रावजी
भावाला ओवाळाया ॥

माझे माहेर आईबाप
आस एक श्वास
बंधुत्वाचे प्रेम अपार
विश्वासाचा खांब खास ॥

नको दादा मला पैसे
नको तुझ्याकडून आंदण
नाही मला मोह हाव धनाची
मनोभावे वात्सल्य मी मागेन ॥

पाठीराखा पाठीशी उभा
बहिणीची आस वेडी माया
अविभाज्य हृदयाचा प्राण
चंदनासारखी तुझी काया ॥

*प.सु.किन्हेकर*
*वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🌸🔹♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*आस एक श्वास*

संपला शब्दांचा मारा
वांझोटी दुषनांचा काळ
कुस उजवली माझी
उदरात वाढतो बाळ

आस एक श्वास माझा
तुजसाठीच चिमुकल्या
अनंत मरणयातना मी
यासाठीच सहन केल्या

येशील तू भूवरी जेंव्हा
स्वागताला सज्ज आम्ही
काळजाचा तुकडा तू
हर्षाची होय तेंव्हा खुमखुमी

लडिवाळ रुप तुझे
विसरली तहानभूक
समजतात तुझ्या भावना
असे भाषा जरी ती मूक

ह्रदय जरी दोन आपले
करपल्लवी कळतात खुणा
आस एक श्वास तू
जाणते अंतरीच्या भावना

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🌸🔹♾️♾️♾️♾️
*आस एक श्वास*

गरीबीच्या दुनिये मधला
मी एक आहे राजहंस
काळजावर घाव घालून
खातोय सुखाचा घास..

चांदण्या सोबती रात्रीला
कष्ट कपाळी घाम जाळतो
सलाखून तापून निघूनिया
स्वप्न उराशी बांधूनी टांगतो..

समोरचा हवेली बंगला असो
मुळीच नाही मला देणे,घेणे
माझी झोपडीच उच्च महाल
सतत अभिमानाचे जगणे..

असा पदवी पथक आगार
चांदण्याला बांधूनी झोका
नेईल चांदू मामा जवळ
विश्वस्त गगणी पृथ्वी नौका ..,

काळ सुखाचा धागा विणे
चैतन्याचे चांदणे हमखास
पलटावे दुःख सारे-सारे
यशस्वी आस एक श्वास…

*शिवाजी नामपल्ले*
अहमदपूर जि.लातूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🔹🌸🔹♾️♾️♾️♾️
*आस एक श्वास*

आस एक श्वास
मनी भासे जरी भास
जन म्हणती आंधळा विश्वास
पण हे नाते असे भक्तांचे खास

पहिल्या पावसाने
सुगंध दरवळते मातीतून
तुझ्यावरील विश्वासाने
माझेही हिरवळते रे मन

तुझ्या सोबतीचे भास
ठायी ठायी तुझा आभास
तू भरवतोस मज प्रेमाचा घास
असतोच माझा आसपास

शब्दांच्याही पलीकडले
माझे मी तुझे नाते
जरी मी खचून कोलमडले
तूच मज आधार देते

आस एक श्वास
जरी समोर काटेरी वाट
आहे मज विश्वास
फुलवशील तू पुष्पांचे घाट

*सौ.ज्योती सुधीर कार्लेवार चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🌸🔹♾️♾️♾️♾️
*आस एक श्वास*

रसरसत्ता कणसातून
ऊंडारल्या मी चांदण्या
हिरवा पदर पोटरीचा
आतुर मज झोंबण्या

लवलवत्या कापसाच्या पाती
अन दांडातून सळसळणारं पाणी
हळुवार स्थिरावलेला बगळा
टिटवी गातसे गाणी

तू तिथे उभा उसात
आस एक श्वास
सळसळती पाने उसाचे
भास असे की आभास

सुख असे पिकात डूलते
मनात मोर लागते नाचू
हिरवाई डोलते तनात
नेसून हिरवा पाचू

हळू हळू झाकाळते आकाश
होते घरी जायची घाई
संभ्रम उठतो मनात
तू नेमका त्यास वेळी येई?

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🌸🔹♾️♾️♾️♾️
*आस एक श्वास*

आस एक श्वास
मोकळा असावा
स्वतःच्या मर्जीने
स्वतःसाठी घ्यावा

धावणं लिहलयं नशीबी
धावते ही ती आनंदाने
कुटुंबाच्या सुखासाठी
झुरतेयं क्षणाक्षणाने

तिचा वेळ तिच्यासाठी
सर्वाथाने घेऊ द्या
आस एका श्वासाची
आता आपण पूर्ण करुया

बाईपण भारी देवा
पुराणात ही सांगितले
तुलना नाही पुरुषांशी परंतु
तिच्या श्वासांच गणित आहे वेगळे

*सौ. रजनी भागवत*
ऐरोली, ठाणे
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles