निवडणूक आयोगापुढे ‘4M’ चे आव्हान; 18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

निवडणूक आयोगापुढे ‘4M’ चे आव्हान; 18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पैसे वाटणा-या उमेदवारांचे फोटो पाठवून करा तक्रार

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी 18व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 19 एप्रिल ते 1 जूनपर्यंत चालणारी ही (Lok Sabha Election 2024) निवडणूक एकूण सात टप्प्यांत होणार आहे. चार जून रोजी लोकसभा, चार राज्यांतील विधानसभा आणि पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

महत्वाचे म्हणजे, लोकसभेची ही निवडणूक निष्पक्ष आणि निर्भिड वातावरणात करण्यावर आयोगाचा सर्वाधिक भर राहणार आहे. यासाठी ‘4-एम’चे आव्हान सर्वात मोठे असून त्यावर मात करण्यासाठी आयोगाने इत्थंभूत तयारी केली आहे.

_काय आहेत ‘4-एम’?_

निवडणूक आयुक्तांनी आजच्या पत्रकार परिषदेत ‘4-एम’बाबत चर्चा केली. हे ‘4-एम’ म्हणजे, मसल पावर, मनी पावर, मिसइंफर्मेग्शन आणि एमसीसी (मॉडर्न कोड आफ कंडक्ट) होय. निवडपात आयोगाने हे सर्व स्वतःसाठी आव्हान असल्याचे सांगितले आहे. या समस्या सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने तारखा जाहीर होण्यापूर्वीच तयारी केली आहे.

निवडणूक आयुक्तांंनी आजपासून निवडणूक आयोगाचे उल्लंघन करणाऱ्या कारवाई सुरू होणार असल्याचे जाहीर केले. बळाचा वापर नियंत्रित करण्याची तयारी सर्वप्रथम, मसल पावरवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोगाने पुरेशा संख्येत सीएपीएफची तैनाती केली जाईल. यावेळी निवडणुकीपूर्वी नवा प्रयोग केला जात आहे. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि रक्तपात रोखण्याचा प्रयत्न आयोगाकडून केला जात आहे.

तक्रार पोर्टल आणि नियंत्रण कक्षात एक वरिष्ठ अधिकारी तैनात केला जाईल. यावर कोणत्याही प्रकारची तक्रार मिळाल्यानंतर शंभर मिनिटाच्या आत त्यावर कारवाई केली जाणार आहे. एवढेच काय तर, आयोगाकडून तक्रारकर्त्याचे मोबाईलची लोकेशन शोधून ही कारवाई करणार आहे. ज्या ठिकाणाहून बेकायदेशीर कारवाया होण्याची शक्यता आहे त्या सर्व ठिकाणावर कडक पाळत ठेवली जाईल. आंतरराष्ट्रीय सीमेवर अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. मतदान दुस-यांदा करावे लागणार नाही याची खबरदारी सुध्दा आयोगाकडून घेतली जात आहे.

_पैशाच्या वापराबाबत कठोरता राहील_

मनी पॉवरला आळा घालण्याच्या मुद्यावर बोलताना राजीव कुमार म्हणाले की, मागील दोन वर्षांच्या काळात 11 राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. यात आयोगाने 3400 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत जप्त केलेल्या पैश्याच्या तुलनेत हा आकडा 800 पट जास्त आहे, असेही आयुक्त राजीवकुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles