शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : अफलातून☄*
*🍂शनिवार : १६ / मार्च /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी सभासद नोंदणी करूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अफलातून*

अफलातून नियोजन तुझे
अन् तयारी आहे जोरात
भारतीय प्रशासन सेवेत
आता मिरवशील तोऱ्यात

कष्टाचं होईल चीज तुझ्या
यश बरसेल रे अंगणात
तुझ्यासह आई वडीलांची
चर्चा होईल सर्व कुटूंबात

विसरू नको मात्र कधी
प्रगतीपथावरील अडसर
खंबीर आधार देणाऱ्या
आदर्श मार्गदर्शकांचे कर

अपेक्षित होतं जे जे तुला
निहित अधिकाऱ्यांकडून
प्रामाणिकपणे अर्पण कर
तेच इतरांना तुझ्याकडून

विनयशील होकार कधी
कधी दे तीव्र,स्पष्ट नकार
कर शुभारंभ स्वतःपासून
तुडव पायदळी भ्रष्टाचार

जनकल्याणासाठीच राख
या पदाची अमुल्य प्रतिष्ठा
आचरणात सदा दिसू दे
तुझ्या कर्तव्याप्रती निष्ठा

*मीता नानवटकर नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿
*अफलातून*

अफलातून हा सारा संसार
बघा नजरेतुन हे अधिकार!

समाजाचा नको तिरस्कार
मुख्य घटक हा जीवनभर!

विचारांची तळपती तलवार
होऊ नये रे वार दुसऱ्यावर!

कुणाचे पाप घेई डोक्यावर
ठरवतो कुणाला कसुरदार!

अफलातून कलियुगाचं वार
कलागुणांचा हा आविष्कार!

बेतलं कधी तुझ्या जीवावर
संघर्षातून करावा प्रतिकार!

शोध सत्य अफलातून खरं
बसेल विश्वास डोळ्यावर!

नको विसरायला संस्कार
यशाची शिदोरी बरोबर!

मनशांतील हवाय आधार
आदर प्रेमाचा तू स्वीकार!

अफलातून नात्याची दोर
जीवनी मोत्याचा सागर!

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿
*अफलातून*

एक दिवस मला
स्वप्न भारी पडलं
आणि सारं काही
अफलातूनच घडलं

स्वप्नामध्ये काय सांगू
काय मी बघितलं
शिवराय आणि भीमा
यांच दर्शन मला घडलं

त्यांची चाहूल लागतात
राजकारण पहिले हललं
शिवा आणि भिमाने
त्यांनाच टार्गेट ठरवलं

देशाची बघून अवस्था
त्यांचं मन ही खचल
सोडून गेले होते देश कसा
आणि आता काय भासलं

घाणेरडा राजकारणाचं
त्यांनी पितळं उघडं पाडलं
योग्य अशा लोकांचं
सरकार त्यांनी बसवलं

जनतेच्या चेहऱ्यावर आता
आनंदाच फुल फुललंं
गोरगरीब श्रीमंत
असं भेदच पुसलं

पहाटेचा गजर होतात
स्वप्न माझं तुटलं
जाग येताच, पुन्हा
देशाचे जुनं चित्र दिसलं

असे वाटे मना, देशात
होईल का पुन्हा बदलं
हे अफलातून स्वप्न
खरंच प्रत्यक्षात उतरलं?

*कु. स्नेहल अनुप माथनकर वरोरा जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿
*अफलातून*

किती अफलातून
गुलाबी गुलाब हा
मंद सुवासानं
भुलवतो मनाला हा ॥१॥

गुलाबी रंग जसा
आरक्त संध्याछायेचा
नाजुक गुलाब स्पर्श
हा मखमालीचा ॥२॥

अफलातून गुलाबाचा
बनला पुष्पगुच्छ छान
मोहवूनी गेलो मी
या गुलाबी रंगान ॥३॥

धुंद करतो साऱ्यांना
जणूं सुधेचा प्याला
गुंफतां कुंतलात
खुववितो सौंदर्याला ॥४॥

माझ्या साजणीला
याने वेड कसे लावले
हृदयाला तिच्या,
याने प्रेमाने सजवले ॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿
*अफलातून*

क्षणभर ना स्थिर
बैचेनीचे आगार असे
वाहते वारे जणू ते
चौफेर उधळण करीतसे

उंच गगणी स्वैर भरारी
सप्तपाताळी डोकावत असे
अवकाशात क्षणभर कधी
कधी पृथ्वीवर रमतसे

कल्पनेला पंख देवून
वास्तव आनंद घेत असे
सरसर कडेकपारीतून
झरझर निर्झर पोहतसे

स्वर्गात कधी हिंडून येई
परी दुनियेत विहारत असे
राक्षसी कल्पना कधी तर
अवाढव्य भूचर निर्मितसे

एक म्हणू की म्हणू अनेक
अकल्पित सारे कल्पित असे
कुठे लागेना ठाव मनाचा
अफलातून विश्व बनवितसे

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿
*अफलातून*

मोबाईल मानवनिर्मित यंत्र
आहेच अगदी अफलातून
याने लहान थोर तरुण वृध्द
सगळ्यांना टाकलं वेडावून

खेळ मनोरंजन बातम्या
माहितीची देवाण घेवाण
इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक
युवा वर्गाचा जीव की प्राण

निसर्गाचं सौंदर्य टिपण्यासाठी
मदतीला धावतो यातील कॅमेरा
घरबसल्या मोबाईलवर त्वरित
आसन आपले आरक्षित करा

विविध खाद्यपदार्थ पाककृती
सहज मिळते सगळी माहिती
वने प्राणी पक्षी लोकजीवन
पाहायला मिळते विदेशी संस्कृती

मुलांचे रडणे बंद करण्याचे
मोबाईलचं एक प्रभावी साधन
ऑनलाईन बँकिंग व्यवहाराचे
उच्च प्रतीचे डिजिटल माध्यम

कधी झालीच वीज गुल तर
कर्तृत्व मोबाईलचे अफलातून
घरातील अंधार दूर करण्यास
टॉर्च लागलीच येते की धावून .

*अनुराधा बाबाराव भुरे,नांदेड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿
*अफलातून*

अफलातून रंगला आमचा
बाल कलाकारांचा सोहळा,
बहारदार गीतांनी तो नटला
कार्यक्रमच आगळावेगळा…

पर्वणीच लाभली होती जणू
नेत्रदीपक सोहळा पाहण्या,
जमली अबाल थोर मंडळी
चिमुकल्यांचे कौतुक करण्या…

भरभरून दाद देत प्रेक्षकही
मंत्रमुग्ध होऊन बसले बघत,
कार्यक्रमाची वाढतीच रंगत
अबालवृध्दही बसले जागत…

बाल कला महोत्सवानिमित्त
विवीध गुणदर्शन आले दिसून,
कधी न समोर येणारी मुलं
नृत्यकला सादर अफलातून…

एकाहून एक सरस गाणी ती
डोळ्याचे पारणे फिटेल अशी,
सर्वच गाणे प्रतिसाद जोरदार
वेगळीच छाप पाडली तशी…

सदाबहार स्मरणात राहणारा
अफलातून कार्यक्रम सोहळा,
मनोमन कृत्यकृत्य झाले सर्व
पाहण्या झाले होते जे गोळा…

*बी एस गायकवाड,पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿
*अफलातून*

निरक्षराने होण्या साक्षर
गिरविले अक्षर’आ’आईचा
कामातून अवधी काढून
हौसेने शिकती’म’माईचा

फसवणूक न होण्यासाठी
धरली लेखणी हातात
नाव स्वतःचे लिहिते झाले
आनंद ना मावे गगनात

नातवासह आजी बसे
अज्ञानातून पुढे जाण्यास
वाचती अक्षर पुढे पुढे
ठिपका निरक्षराचा पुसण्यास

खूप शिकावे पुढेच जावे
जरी कळले या वयात
न राहीन शिक्षणास वंचित
ठासून भरले खूप मनात

अफलातून अशा प्रयोगाने
अंतर्मनी प्रौढ सुखावली
व्यवहारज्ञानात अंकगणित
बाराखडीची छाप उमटली

*सौ. वनिता महादेव लिचडे, भंडारा*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿
*अफलातून*

*वर्षामागून वर्षे अशीच*
*ती जाताहेत निघून*
*साठी पार झाली*
*धोत्तर हाती धरून*
*सत्तरीकडे वाटचाल अफलातून……!*

*नजर अंधुक अन्*
*कान नुसते टवकारून*
*अजिबात जात नाही*
*जरासुद्धा गोंधळून*
*काठी आहे मदतीला अफलातून……!*

*हे जीवन असेच असते*
*म्हणे कळे सारे अनुभवातून*
*पण आत्तातर कळत नाही*
*पाहात असतो बावचळून*
*यालाच नाव आहे अफलातून……!*

*जन्म हा सुद्धा अफलातून*
*गाठीभेटी साऱ्याच अफलातून*
*येणारा जाणारा क्षण अफलातून*
*जीवन जगणेसुद्धा अफलातून*
*अन् अंतिम क्षण तर त्याहून अफलातून……!*

*प्रा.विलास चौगुले (सर)*
*दौंड,पुणे.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿
*अफलातून*

सोन पावलांनी आनंद उधळित
आल्या सुखाच्या लहरी
चैतन्याचा पारी जात
फुलला माझिया दारी

भारावून गेले मन
दाटून आले नयन
खरंच हे स्वप्न होते का
होता त्याला वास्तवाचा आधार
मनी पाहिलेलं स्वप्न माझं
जणू आज झाले होते साकार

घडलं होतं सारं
अफलातून माझ्या जीवनी
आनंदाचे अन आनंदाचेच
मन गाऊ लागले गाणी

केली देवाला प्रार्थना
अशीच राहो तुझी साथ
खूप सोसले रे देवा
आता मात्र होऊ दे कायम
तुझ्या कृपेची बरसात
तुझ्या कृपेची बरसात……

*सौ स्नेहल संजय काळे, सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles