मराठीचे शिलेदार; अशोक मोहिते

मराठीचे शिलेदार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आम्ही मराठीचे शिलेदार
समूह आमचा हा दमदार!
एकमेकांना वेळीच आधार
भरोसा प्रत्येक सदस्यांवर!

पारखी आमची असे नजर
खेळते सरस्वती जिभेवर !
मनमिळावू स्वभाव सुंदर
लेखणी बने कधी तलवार!

तर कधी मोरपीस जरूर
परस्परांचा करतो आदर !
गुंफिली पुष्पमाला सुंदर
सदस्य आमचे सदा थोर!

कर्तव्याची दिशा दर्जेदार
चवीला रे गोड साखर !
एकोपा टिकवून खरोखर
सोबतीला असतो बरोबर!

संकटाशी शर्थीने झुंजणार
नाही मानली कधीच हार!
आम्ही मराठीचे शिलेदार
आधारस्तंभ एक खंबीर !

बदलतो दिशा सामर्थ्यावर
अभ्यासू व्यक्तिमत्व थोर !
समूह हा उंच पातळीवर
सक्षम उत्तरे कर्तव्यावर!

आधारस्तंभ चार दमदार
समूहाचा मनोरा हा सुंदर!
कौतुकाची थाप पाठीवर
आदर्श सदा डोळ्यासमोर!

कर्ता करविता एक खंबीर
अध्यक्ष राहुल पाटील सर!
ताई अन् दादा साथीदार
आदर्शमय सदैव विचार !

जोडली प्रेमळ नाती सुंदर
आम्ही मराठीचे शिलेदार!

अशोक महादेव मोहिते
बार्शी,जिल्हा सोलापूर
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles