किल्ले कर्नाळा; स्वाती मराडे

किल्ले कर्नाळापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘कर्नाळा’ हा रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात किल्ला आहे. पनवेल पासून १२ किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो. सह्याद्री पर्वत रांगेतील हा गिरीदुर्ग आहे. देवगिरीचे यादव व तुघलक शासक यांच्या अंतर्गत इ.स. १४०० पूर्वी याचे बांधकाम झाले असावे. कर्नाळा त्यांच्या संबंधित साम्राज्याच्या उत्तर कोकणची राजधानी होता.

कर्नाळा किल्ला हा पक्षी अभयारण्यात येतो. या किल्ल्याचा सुळका विशेष लक्ष वेधून‌ घेतो. हा सुळका अंगठ्यासारखा दिसतो. किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर एक मोठा वाडा दिसतो. परंतु तो सध्या सुस्थितीत नाही. किल्ल्यावर करणाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला सतीशिळा आहेत. किल्ल्याची तटबंदी भक्कम असली, तरी आता तिचे बरेच नुकसान झाले आहे. किल्ल्यावर असलेले‌ दोन बुरुज सुस्थितीत आहेत. किल्ल्यावर थंड पाण्याच्या दोन टाक्या आहेत त्यामुळे पाणी मुबलक आहे. सभोवतालचा परिसर विविध पक्ष्यांनी समृद्ध असा आहे. स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. सुमारे १५० जातीचे पक्षी येथे पहावयास मिळतात. ४० प्रकारचे पक्षी हे प्रवासी अथवा स्थलांतरित प्रकारचे आहेत.

वनाचा भाग पानझडी वृक्षांनी व्यापलेला आहे. येथे वनौषधी व दुर्मिळ वनस्पती आढळतात. किल्ल्याकडे जाणारी वाट कठीण व खडकाळ असल्याने, ट्रेकर्ससाठी हा आकर्षण आहे. दाट जंगलाची सावली व पक्ष्यांच्या आवाजाचा मागोवा घेत डोंगररांगावरून चढताना किल्ल्याची तटबंदी लागते. त्यातून प्रवेश केला की, खालून अंगठ्यासारख्या दिसणा-या सुळक्याची भव्यता जाणवू लागते. येथून प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगगड, माणिकगड यांचेही दर्शन होते. आजही कर्नाळा किल्ला पक्ष्यांचेच नाहीतर पर्यटकांचेही आकर्षण ठरला आहे. पनवेल येथून कर्नाळा येथे जाण्यासाठी विविध बस आहेत. पनवेलहून निघाल्यानंतर चिंचवणनंतर पुढील थांबा ‘कर्नाळा’ पक्षी अभयारण्य आहे. येथे अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपण जातो. येथून किल्ल्यावर जाण्यासाठी दोन तास लागतात.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles