होळी
दिन होळीचा पवित्र
स्वच्छतेचे व्रत घेऊ
एकत्रित येऊ सारे
समतेचे गीत गाऊ ॥१ ॥
अहंकार लोभ मोह
कायमचे दूर ठेवू
माणुसकी अंगीकारू
एकतेला साथ देऊ ॥२ ॥
रुढी अनिष्ट प्रवृत्ती
अंधश्रद्धा ते दहन
कुविचार दूर सारा
स्वच्छ ठेवा अंतर्मन. ॥३ ॥
परिसर स्वच्छ करू
करू राग व्देष होळी
काडी कचरा जाळून
देऊ सारेच आरोळी ॥४ ॥
सर्वजण गोळा होऊ
एकात्मता मंत्र देऊ
सानथोर एकमेका
प्रेमानेच रंग लाऊ ॥५ ॥
दीपककुमार सरदार
तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
=============