सूर जुळावे फिरूनी
शिवधनुष्य पेलण्याची
धमक कोणात आहे ?
छत्रपतींच्या भावनेशी
खेळणार कोण आहे ?
शिवनीतीला छेदण्याची
पाहावी किती रे वाट ?
खंजीर खुपसणाऱ्यांची
दरबारी आली रे लाट ?
डरकाळी फोडतो छावा
भांडतांना रे मावळ्यांशी
सूर जुळावे फिरूनी पण
करी दोस्ती कावळ्यांशी
कोमेजून गेलाय रे मळा
पाहून सभा लांडग्यांची
केसांनी कापलाय गळा
आली उबग लफड्यांची
ढाल बनूनच रे राहणारी
कशामुळे झालेत रे वैरी ?
शर्थीने खिंड लढविणारी
झाडतात शब्दांच्याच फैरी
सूर जुळावे फिरूनी यांचे
ही भावना रे मावळ्यांची
पाखरांनी फिरूनच यावे
उघडून दारेच स्वराज्याची
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
========