संजय निरूपम शिवसेनेत प्रवेश करणार? ‘या’ मराठी नटांचीही चाचपणी

संजय निरूपम शिवसेनेत प्रवेश करणार? ‘या’ मराठी नटांचीही चाचपणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

मुंबई: राजकारणात सतत काही ना काही बाबी दररोज घडत असतात. काल कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी केलेले संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. संजय निरूपम हे शिवंबधन बांधणार का? हा ही महत्वाचा प्रश्न आहे. मराठी चित्रपटसृष्टी गाजविणारे मराठी अभिनेतीही शिवसेनेत प्रवेश करणार असून याबाबत त्यांची चाचपणी करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील आणि मुंबईच्या उमेदवाराचा तिढा सुटेल अशीही माहिती प्राप्त झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी अशी राज्यात लढत होत असून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नाराजांची मनधरणी करण्यसाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडत आहेत.

यातच आता काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या संजय निरुपम यांची उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं संजय निरुपम यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. निरुपम यांच्यासोबतच शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर या मराठमोळ्या कलाकारांची देखील चाचपणी सुरु असल्याचं वृत्त समोर येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles