रंगात तुझ्या…; सिंधू बनसोडे

रंगात तुझ्या…



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

फाल्गुन कृष्ण पंचमीचा
साजरा उत्सव होळीचा
सप्तरंगाच्या रंगात न्हाऊन
चल आस्वाद घेऊ पोळीचा

तुझे वसंतासम आगमन
उधळण रंगांची करणारे
राधा-श्रीकृष्ण पूजन आरंभी
मनास मोहून भुलवणारे

प्रेमाचा सुंगध उधळून
संस्कृती,नाते जपणारे
बेधुंद उधळून सारे रंग
मणभर ओलाव्यात भिजणारे

सूर्य देवाची प्रखर झळ
पाहून तुझ्याकडे खेळास जोर
लाही उन्हाच्या कहरात …
रंगात मस्ती तुझी खट्याळ फार

ऋतू शुभारंभ तुझा
नि माझ्या प्रेमात शीतलता
शास्त्र असे सांगते बघ
दूर करू दुराव्याची प्रखरता

तुझ्या रंगात न्हाऊनी
प्रेमाची संस्कृती जपुया
द्वापार , कली युगाची महती
नवीन युगलांस सांगुया

सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles