भंडारा गोंदिया रणसंग्राम – साकोली विधानसभा मतदारसंघात वाढलेला टक्का कुणाला देईल धक्का

भंडारा गोंदिया रणसंग्राम – साकोली विधानसभा मतदारसंघात वाढलेला टक्का कुणाला देईल धक्का



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_साकोली क्षेत्रातील ‘रेकॉर्डब्रेक’ मतदान ठरविणार खासदाराची ‘लीड_

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा मतदारसंघांपैकी साकोली विधानसभा मतदारसंघात रेकॉर्डब्रेक मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान झालेल्या साकोली विधानसभा क्षेत्रातील निवडणूक विजयी उमेदवारासाठी लकी ठरणारी आहे. कारण येथील वाढलेली मतदानाची टक्केवारी ! हा मतदानाचा वाढलेला टक्का कुणाला धक्का देईल हा आता औत्सुकतेचा विषय ठरत आहे.

साकोली विधानसभा क्षेत्रात साकोलीसह लाखनी, लाखांदूर हे तीन तालुके येतात. या विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार ३,२३,७७५ असून ३७५ मतदान केंद्र आहेत. साकोली क्षेत्रात ७१.३२ टक्के मतदान झाले. या मतदानाची टक्केवारीच भंडारा-गोंदियाच्या खासदाराला लीड मिळवून देईल, असे आकडे सांगत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचा हा गृहमतदारसंघ आहे. सोबतच काँग्रेस पक्षाचा स्थानिक स्वराज्य संस्थेतही दबदबा आहे. तर दुसरीकडे पटोलेंचे कट्टर विरोधक भाजपाचे माजी पालकमंत्री परिणय फुके यांनी साकोलीला आपली कर्मभुमी मानल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसाठी साकोली मतदारसंघातील मतदान हे मॅजिक फॅक्टर ठरेल, असा दावा केला जात आहे. त्यामुळेच या मतदारसंघाची राज्याच्या राजकारणातही चर्चा चांगलीच रंगत आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान झालेल्या साकोली विधानसभा क्षेत्रातील निवडणूक विजयी उमेदवारांसाठी लकी ठरणारी आहे. या विधानसभा क्षेत्रात दिग्गज नेत्यांच्या हजेरीने काँग्रेस व भाजपाने विजयाचे दावे केले आहेत. असे असले तरी येत्या ४ जूनला येथील मतदारांनी कोणाची बटन दाबली हे सुनिश्चितत होणार आहे. काँग्रेसने एक लाखांच्या मताने जिंकण्याची तर, भाजपने १०० टक्के विजयाची खात्री दिली आहे. भंडारा लोकसभा क्षेत्रात प्रचाराचे केंद्रबिंदू साकोली विधानसभा क्षेत्र होते. प्रचाराची खरी रणधुमाळी या क्षेत्रात दिसून आली. काँग्रेसचे राहुल गांधी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांची प्रचारसभा साकोली झाली. दोन्ही सभेला भरभरून गर्दी होती. त्यामुळे दोन्हीकडच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोश भरला होता. या प्रचारसभांचा फायदा कुणाला होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

या संदर्भात काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून काँग्रेसचा उमेदवार एक लाखाच्या फरकाने जिंकून येईल व साकोली विधानसभा क्षेत्रात २५ ते ३० हजारांचे लीड राहील. हे लीड विजयात महत्त्वाचे ठरणार आहे असा दावा केला जात आहे. नाना पटोले यांचे कार्य व व भाजप उमेदवाराबद्दलच्या नाराजीचा काँग्रेसला नक्कीच फायदा होणार असल्याचेही बोलले जात आहे. तर भाजपाचे साकोली विधानसभेतील भाजपाचे वरिष्ठ नेते माजी आमदार बाळा काशीवार यांनी, या निवडणुकीत भाजपचा १०० टक्के विजयाचा दावा केला आहे. या क्षेत्रात नागरिकांची चर्चा काहीही असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोंदींवर मतदारांचा विश्वास आहे असा दावा भाजपा कडून केला जात आहे. काँग्रेस व भाजप विजयाची खात्री देत असे असले तरी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार वाघाये किती मते घेतात, याकडे राजकीय वर्तुळात गणित आखले जात आहेत. विविध समिकरणांचा आधार घेऊन विजयाचा दावा केला जात आहे.

_गावागावतील कार्यकर्त्यांची गोळाबेरीज_

साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यात १८ जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. साकोली तालुक्यात काँग्रेसचे तीन, भाजपाचे दोन व अपक्ष एक जि. प. सदस्य असून पं.स. वर काँग्रेसची सत्ता आहे. लाखांदूर तालुक्यात काँग्रेसचे दोन, भाजपाचे दोन, राष्ट्रवादीचा एक व बसपाचा एक जि. प. सदस्य असून पं. समिती राकाँ भाजपाच्या हातात आहे. लाखनी तालुक्यात काँग्रेसचे चार, भाजपाचा एक व अपक्ष एक जि. प. सदस्य असून पं. समितीवर काँग्रेसची सत्ता आहे. एकंदरीत साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे ९, भाजपा-राकाँचे ६ , बसपा एक तर अपक्ष दोन जि. प. सदस्य आहेत. जि. प. सदस्यांच्या आकडेवारीवरुन साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे पारडे जड असल्याचे सध्यातरी चित्र आहे. या आकडेवारीवरुन मतदारांचा कल कुणाकडे राहू शकतो याची गोळाबेरीज दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळींचे गावागावतील कार्यकर्ते करीत आहेत.

■ एकूण मतदार : ३ लाख २३ हजार ७७५
■ झालेले मतदान : २ लाख ३० हजार ९१८ (७१.३२ टक्के)
■ पुरुषांचे झालेले मतदान : १ लाख १७ हजार ९७२ (७२.७० टक्के)
■ महिलांचे झालेले मतदान : १ लाख १२ हजार ९४६ (६९.९४ टक्के)
■ इतर मतदार : शून्य एकूण टक्केवारी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles