पहिल्या आंतरराष्ट्रीय शिळवादक परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिल्या आंतरराष्ट्रीय शिळवादक परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

पुणे: व्हिसल वर्ल्ड संस्थेतर्फे संस्थेचे
संस्थापक, अध्यक्ष आणि विश्वविख्यात ज्येष्ठ डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली शिळवादकांची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली.

डाॅ.दीपक फाल्गुने यांच्या शुभहस्ते उदघाटन झाले. निमंत्रक उषा फाल्गुने यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन सारिका सासवडे यांनी केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या शहर कार्याध्यक्ष भारती महाडिक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डाॅ.मधुसूदन घाणेकर
संपादित डहाळी अनियतकालिकाच्या 517व्या विशेषांकाचे प्रकाशन, तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक अध्यक्ष प्रिया दामले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

ज्येष्ठ शिळवादक अनघा सावनुर आगाशे यांना डाॅ.मधुसूदन घाणेकर आणि सौ.मेघना घाणेकर यांच्या शुभहस्ते शिळवादक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्वशांति प्रतिष्ठान संस्थेतर्फे भारती महाडिक यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना आंतरराष्ट्रीय चतुर्युग शिळवादक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

“शिळवादनात रसिकांचा ताणतणाव मुक्त करण्याची क्षमता असते. शिळवादनातून ध्यानधारणेची अनुभूति येते ” असे प्रतिपादन डाॅ.घाणेकर यांनी केले.” डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी भारतासह 17 देशात ,जिथे जिथे रसिक तिथे तिथे 60 वर्षांहून अधिक काळ विनामूल्य शिळवादन केले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन शिळवादनासह साहित्य, व्यंगचित्र, चित्रपट गीत गायन, ग्रॅफाॅलाॅजि, ब्रम्हध्यान लघुपट, ज्योतिष, एकपात्री कला तसेच अनुबोधपट,संपादन, महिला सबलीकरण, प्रबोधन, विश्वजोडो अभियान, मानवधर्म सर्वश्रेष्ठ धर्माचा प्रसार,समाज कार्य आदि विविध क्षेत्रात ‘ न भूतो न भविष्यति ‘ असे कार्य केले आहे “असे गौरवोद्गार भारती महाडिक यांनी डाॅ.घाणेकर यांचा जाहिर सत्कार करताना काढले.

तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेतर्फे संस्थापक अध्यक्ष प्रिया दामले यांच्या शुभहस्ते डाॅ.घाणेकर यांना तितिक्षा कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त घेण्यात आलेल्या शिळवादन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते अपूर्वा कुलकर्णी आणि रुपेश मुरुडकर यांना डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते व्हिसल वर्ल्ड इंटरनॅशनल ॲवाॅर्डने सन्मानित करण्यात आले. अनघा सावनुर आगाशे, उषा फाल्गुने , किरण गांधी, प्रमोद परदेशी, चंद्रशेखर धर्माधिकारी , विजयकुमार येलेकर तसेच बाल शिळवादक चिन्मय मुरुडकर आणि तनिष्क पाठक आदिंनी शिळवादनाची मैफिल रंगवली.

समारोपात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी गेल्या शतकावर प्रभाव टाकणा-या काही अजरामर हिंदी चित्रपटातील गाण्यांचे शिळवादन करुन उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली.ये दोस्ती अब नही छोडेंगे या गाण्याच्या सामुदायिक शिळवादनाने परिषदेची सांगता झाली. श्रीनिवास तेलंग,विठ्ठल मुरकेवार, शैलजा पाठक, दीपाराणी गोसावी, सुचेता प्रभुदेसाई, आनंद जोशी, विष्णुपंत जोशी आदि विविध क्षेत्रातील मान्यवर या परिषदेस उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles