दहावीच्या परीक्षा शुल्कात १० टक्के वाढ; परीक्षा झाली महाग
नागपूर: दहावीची परीक्षा देणे आता महाग होणार आहे. कारण दहावीच्या परीक्षा शुल्कात 500 ते 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाने ही माहिती दिली आहे. 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणे महाग होणार आहे. 17 नंबरचा परीक्षा अर्ज, नावनोंदणी शुल्क वाढवण्यात आले आहे. शिक्षण विभागाने 17 क्रमांकाच्या अर्जात 30 रुपयांनी तर नोवनोंदणी शुल्कात 110 रुपयांनी वाढ केली आहे. नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क हे 420 रुपयांपासून 470 रुपये करण्यात आले आहे.