भंडारा येथे अनुकंपातत्वावर 15 वर्षा पासून नोकरीच्या प्रतीक्षेत
_मनसेतर्फे मुख्यधिकारी यांना दिले निवेदन_
अनिल पारखी
भंडारा: मनसे प्रेदश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या आदेशानुसार मनसे नागपूर व भंडारा तर्फे मुख्यधिकारी नप भंडारा यांच्या सोबत केली चर्चा श्रीमती अल्का सुदामे यांचे पति नप भंडारा येथे सरकारी नोकरी करीत होते,ड्युटी पिरेड मधे 2007 मरण पावले त्यांच्या पत्नी ने नोकरी मिळावी म्हणून नप भंडारा येथे अर्ज केला
परंतु आज पर्यंत अल्का सुदामा नोकरी मिळाली नाही. अल्का सुदामा यांचे वय निघून गेले,नगर परिषद कार्यलय याचे चकरा मारू मारू त्रासली व अल्का सुदामा ने पुन्हा अर्ज केला. की माझी वय गेली आहे, परंतु अल्का सुदामें यांच्या मुलाला नोकरी द्यावी अशी मागणी मनसे चे तालुका अध्यक्ष नागपूर यांनी केली आणि नप भंडारा प्रशासन अधिकारी यांनी या कडे दुर्लक्ष का केले असा प्रश्न अल्का सुदामेचा परिवार करीत आहे.
भंडारा येथील खासदार मा सुनील मेंढे साहेब,व भंडारा आमदार मा नरेंद्र भोंडेकर साहेब,भंडारा येथील जिल्हाउपधीकारी मा मोरे साहेब मा यांच्या कडे सुध्दा तक्रार केली होती परंतु 15 वर्ष होऊन सुध्दा न्याय मिळत नसेल तर गरिबांनी कोणाकडे दाद मागयची अशी व्यथा मांडत आहे मनसेनी मांडली आहे.या संदर्भात अल्का सुदामे यानी वाडी येथे पत्र परिषद घेऊन न्यायाची मागणी केली आहे.या महिलेला न्याय मिळाला नाही तर मनसे तर्फे उपोषण करण्यात येईल याची दखल प्रशासनाने घ्यावी,असे मत व्यक्त केले.या विषयावर नप मुख्याधिकारी विनोद जाधव यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी,मनसे तालुका अध्यक्ष नागपूर अनिल पारखी नागपूर मनसे भंडारा शहर अध्यक्ष नितीन खेडीकर तालुका विभाग प्रमुख कृष्णा बावनकुळे मनसे तालुका संघटक दीपक ठाकरे,दिनेश भजनकर,शहर सचिव हर्षल भजणकर मनसे वाडी,सूरज भलावी नागपूर,शहर संघटक पुष्पल मोरे, वाडी ओमबाई जनबंधू ,विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष रोहन शर्मा व मनसे कार्यकर्ते भंडारा उपस्थित होते.