जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला शिवसेना पक्ष :संजयबाबा घाटगे

जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला शिवसेना पक्ष :संजयबाबा घाटगेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_केनवडे येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ_

सुभाष चौगले, कुडूत्री (प्रतिनिधी)

राधानगरी: हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ५६ वर्षापूर्वी मराठ्यांची अस्मिता ज्वलंत ठेवण्यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली. जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यात पक्षाची भूमिका नेहमी सकारात्मकच आहे.८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धर्तीवर शिवसेनेचे समाजकार्य अखंडपणे सुरू आहे. ठाकरे कुटुंबियांमुळेच मुंबई सुरक्षित असून जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला पक्ष म्हणजे शिवसेनाच होय. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून ठाकरे कुटूंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी कार्यकर्त्याना केले. केनवडे ता.कागल येथे अन्नपूर्णा शुगर कारखाना कार्यस्थावर शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अन्नपुर्णा कारखाना कार्यस्थळावर संजयबाबा घाटगे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे आदेशाने व शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे,संजय पवार ,उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख अशोकराव पाटील, शिवगोंड पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सदस्य नोदंणीचा शुभारंभ माजी आमदार संजयबबा घाटगे यांचे हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी शिवसेना सदस्य नोंदणीत ५०० सदस्यांची नोंदणी करण्यात आली.

कार्यक्रमास निराधार समितीचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे, ए.वाय.पाटील, के.के.पाटील,भैरू कोराणे,महेश देशपांडे,अशोक पाटील,काकासो सावडकर,युवराज कोईगडे, विष्णूआण्णा गायकवाड, बाजीराव पाटील, धोंडिराम एकशिंगे आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles