निःशुल्क जेनेटिक ब्लड मॅचिंग ॲपचे उद्घाटन 29 रोजी
_मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार उद्घाटन_
नागपूर: थॅलेसेमिया आणि सिकलसेल हे गंभीर आजार असून या रुग्णांना दर पंधरा ते वीस दिवसांनी रक्त द्यावे लागते आणि आयुष्यभर महाग औषधी घ्यावी लागतात. सिकलसेल आजाराने ग्रस्त रुग्णांना हातपाय आणि अंगात दुखत असल्याने त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागतात. आणि थॅलेसेमिया आणि सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया गेल्या 25 वर्षापासून आजारावर उपचार आणि प्रतिबंध यासाठी मोफत काम करत असते म्हणून या द्वारे ब्लड मँच अँप तयार करण्यात आलेला आहे.
त्या ॲपचे उद्घाटन मोहनजी भागवत यांच्या हस्ते येथे 29 जुलै रोजी 3:30 वाजता. हॉटेल सेंटर पॉईंट रामदासपेठ येथे होणार आहे. अशी माहिती पत्रपरिषदेमध्ये डॉक्टर विंकी रुघवानी यांनी दिली.