युवा स्वतंत्र सेनानी बिरसा मुंडा यांना अभिवादन
गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी
नागपूर :- फुटाळा चौकातील आदिवासी युवा स्वतंत्र सेनानी आदरणीय पूज्यनीय बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच सौ.देवलताई बेहाडे यांच्या नेतृत्वात अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे मुख्यसचिव किशोर बेहाडे ,विजय डोंगरे चेतन बेहाडे ,शंकरराव वानखेडे, भुपेंद्र सनेश्वर नाईकजी, दिलीप मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.