अमर नगर ते हिंगणा बसचे आमदार समीर मेघेच्या नेतृत्वात लोकार्पण
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष कमलेश खोब्रागडे यांच्या अथक प्रयत्नाने मा. आमदार समीरभाऊ मेघे यांच्या नेतृत्वाखाली अमर नगर ते हिंगणा बसचे लोकार्पण करण्यात आले. अमरनगर येथील नागरिकांची होणारी पायपीट लक्षात घेता भाजयुमो चे उपाध्यक्ष व आपली बस सुरक्षा समिती चे अध्यक्ष कमलेश खोब्रागडे यांनी ही बाब प्रशासनाच्या समोर मांडली व आज दिनांक १२ ऑगस्ट २०२२ ला यांच्या प्रयत्नाला यश आले व आपली बस अमरनगर ते हिंगणा या बसचे उद्घाटन संपन्न झाले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गोतमारे , माजी जी. प.सदस्य राजेंद्र हरडे, वानाडोंगरीच्या नगराध्यक्ष , निलडोह ग्रामपंचायतचे सरपंच वनिताताई गडमळे यांनी हिरवी झेंडी दाखवत बसचे लोकार्पण केले.
यावेळी प्रामुख्याने हिंगणा बस डेपोचे (डी.डी.ओ) अमोल ठाकरे, आउट शेडिंग ऑफिसर सागर मानेकर, असिस्टंट आऊटशेडिंग ऑफिसर गजानन मारवडे, नगरसेवक नितीन साखळे, नगरसेवक आनंद धडांगे, नगरसेविका रेखा बडोदेकर,राकेश दुबे,उर्मिला गायधने,सुनिता बिजेवार,प्रवेश भाबडा, विलास भागवत,कल्पना सहारे, भगवान बालपांडे, सुखदेव खोब्रागडे,विलास राऊत, रवींद्र रिहल,संजय अग्रवाल,प्रशांत तिमांडे, कैलास सहारे, अश्विनी माटे, हिना रिहल, प्रतीक्षा राऊत, आरती चौरे, नितेश कुबडे व परिसरातील समस्त नागरिक उपस्थित होते. या सर्वांचे आभार या कार्यक्रमाचे आयोजक कमलेश खोब्रागडे यांनी मानले.