
जि. प. प्रा. शाळा खातखेडा येथे विविध स्पर्धेचे आयोजन
भिवापूर: येथे आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोज शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातखेडा केंद्र-महालगाव पं. स. समिती ता. भिवापूर जि.नागपूर येथे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा श्रमदान व स्व्छता रक्षाबंधन वृक्षा रोपण, लसीकरण मोहीम अश्या प्रकारे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नशा ( व्यसन) मुक्त प्रतिज्ञा देण्यात आली. ( तंबाखू , अंमली पदार्थ ) संकल्प करण्यात आले. यात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संध्या शेगोकर यांनी विद्यार्थांना व्यसन मुक्त,नश्या मुक्त या वर मार्गदर्शन केले.
आशा नामदेवराव शेरकी ( अंगणवाडी सेविका) श्री. सुगंधराज म्हैसकर , श्री. रविंद्र थैरे व सौ. अमृता विशाल म्हैसकर, सौ मंदा सुधीर मसराम तसेच अंबुजा सिमेंट फाऊंडेशन अंतर्गत चालू असलेल्या उत्तम कापूस प्रकल्प लोकेशन उमरेड चे प्रक्षेत्र अधिकारी अक्षय जुमनाके यांनी नशा व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन केले.
राजू नवनागे (स. अ ) यांनी विद्यार्थांना तसेच गावातील उपस्थित असलेले मान्यवर यांना व्यसन मुक्तीचे दुष्परिणाम आरोग्यास हानिकारक आहे हे पटवून दिले व संगळ्याना आव्हान करण्यात आले की सर्व आपल्या गावातील लोकांनी व्यसनमुक्त व्हावे हा संकल्प करून नशा मुक्ती प्रतिज्ञा सर्वांना देण्यात आली.
तसेच कु.परी उज्वला राजेश गायकवाड वर्ग 2रा हिचा जन्मदिवस सोनपापडी, लाडू चिवडा देऊन साध्या पध्दतीने केला. अश्याप्रकरे जि.प. शाळा खातखेडा येथे स्वांतत्र्यांचा अमृत महोत्सवाचा सप्ताह साजरा करण्यात आला.