सर्वांगीण मानसिक स्वास्थ्य कार्य लोकार्पण सोहळा उद्या
नागपूर: शहरातील माइंड पार्क फाऊंडेशन 84 माधव नगर, पैजार गल्ली, भंभानी टेक्सटाईल्स जवळ, नागपूर तर्फे आयोजित सर्वांगीण मानसिक स्वास्थ्य कार्य लोकार्पण सोहळा कार्यक्रम १५/०८/२०२२ रोजी संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान होणार आहेत. अशी माहीती डॉ उर्मिला क्षिरसागर यांनी पत्रपरीषदेत दिली.
आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. सुधीर भावे (मानसोपचारतज्ज्ञ) डॉ.अविनाश जोशी (मानसोपचारतज्ज्ञ) सकारात्मक मानसिक आरोग्य मानसिक आजारी व्यक्तींचे पुनर्वसन डॉ. सलीम मुजावर (मानसोपचारतज्ज्ञ) कायदा व मानसिक आरोग्य मैफल -जरा विसावू. निवेदन- मानस शास्त्रज्ञ -डॉ. स्वाती धर्माधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तरी शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. ऊर्मिला क्षीरसागर, श्री. मिलिंद दशपुत्र संचालक माइंड पार्क फाऊंडेशन आयोजकांनी केले आहे.