आईला शिवीगाळ केली म्हणून, मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

आईला शिवीगाळ केली म्हणून, मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बेटाळा येथील घटनेने परिसर हादरला_

✍️अक्षय खोब्रागडे

भंडारा: पवनी तालुक्यातील बेटाळा गावात आईला शिवीगाळ का केली? या छोट्याश्या क्षुल्लक कारणावरून अंगणात झोपलेल्या लहान भावाला मोठ्या भावाने कुऱ्हाडीच्या साह्याने वार करत हत्या केल्याची घटना रविवारीला रात्रीच्या सुमारास बेटाळा येथे घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

पवनी तालुक्यातील बेटाळा येथे शीशुपाल पांडुरंग देशमुख(३५) व तेजराम पांडुरंग देशमुख (४०) हे दोघे सख्खे भाऊ असून एकाच घरात वास्तव्यास होते.दोघे ही भाऊ हे दारू पाणी पिण्याच्या सवयीचे असल्याने त्यांनी घटनेच्या दिवशी पवनी येथून मार्केट आणले होते आणि तेथूनच ते दोघेही दारू पिऊन गावाकडे परतीचा प्रवास करत केला.गावी जाताच लहान भाऊ शिशुपाल देशमुख याने दारूच्या नशेत शेती विकून पैसे देण्यासाठी आई सोबत भांडन घातले आणि आईला शिवीगाळ केली.मोठ्या भाऊ तेजराम देशमुख याने लहान भावाला हटकले तेव्हा भांडण बंद झाले.मात्र मोठ्या भावाचा संताप गेला नव्हता लहान भावा प्रति असलेला राग मोठ्या भावाच्या मनात अनावर न झाल्याने रविवारला रात्रीच्या सुमारास मोठ्या भावाने लहान भावाला(शिशुपाल) चा कोणताही विचार न करता कऱ्हाडीच्या साहाय्याने सपासप वार करत हत्या केली.याची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आले.मोठा भाऊ(तेजराम देशमुख) याला अटक केली असून पुढील पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे हे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles