माफीचा साक्षीदार होण्यासाठी भाजपने स्वतंत्र कक्षच उघडला आहे काय?: शिवसेना

माफीचा साक्षीदार होण्यासाठी भाजपने स्वतंत्र कक्षच उघडला आहे काय?: शिवसेना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माफीचा साक्षीदार होणार आहेत. याबाबत सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. ७ जून रोजी न्यायालयाने त्याला हजर राहण्यास सांगितले आहे.

या दिवशी तो न्यायालयाला काय सांगणार, आणखी काय गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली असून, देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आणि यावरून शिवसेनेने आजच्या सामनातून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. वाझेला माफीचा साक्षीदार करणे म्हणजे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यासारखेच आहे व कायद्याला हे अपेक्षित नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

*आजच्या सामनाच्या अग्रलेखातील प्रमुख मुद्दे…*

शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे म्हणे माफीचा साक्षीदार होणार आहे. राज्यातील विरोधी पक्ष म्हणजे भाजपाने वाझेप्रकरणी केलेला शिमगा विसरता येणार नाही. वाझे म्हणजे ‘वसुली, भ्रष्टाचार’ असे नामाभिधान बनले आहे. वाझे हा भ्रष्टाचार, वसुली, खून अशा प्रकरणातील एक आरोपी आहे. बडतर्फ पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा हस्तक म्हणून वाझे पोलीस खात्यात काम करीत होता. परमबीर सिंह व सचिन वाझे या जोडगोळीने खाकी वर्दीचा गैरवापर करून जे उद्योग केले, त्यामुळे देशभरातील पोलिसांची मान शरमेने खाली गेली. महाराष्ट्राची तर बदनामी झालीच, पण संपूर्ण पोलीस दलास कलंक लागला. अशा वाझेला सीबीआयने राजकीय फायद्या-तोट्यासाठी माफीचा साक्षीदार करावे हे नीतिमत्तेस धरून नाही, अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे.

सीबीआयसारखी केंद्रीय संस्था सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवत आहे हा प्रकार साधासरळ नाही. वाझे याने अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवून दहशतवादासारख्या भयंकर कृत्यात सहभाग घेतला. मनसुख हिरेन हा त्याचा जवळचा मित्र असताना स्वतःच्या व परमबीर सिंह यांच्या बचावासाठी मनसुखची हत्या घडवली. अशा वाझेला सीबीआय आता माफीचा साक्षीदार बनवत आहे. वाझेवर अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. इतक्या भयंकर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपीला माफीचा साक्षीदार बनवता येत नाही. वाझेला माफीचा साक्षीदार करणे म्हणजे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यासारखेच आहे व कायद्याला हे अपेक्षित नाही, अशी खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे.

या सगळ्या प्रकरणात मेख वेगळीच आहे. मला साफीचा साक्षीदार करा, असा विनंती अर्ज वाझेने केला व हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. न्यायालयाने वाझेला दिलासा देताना अट काय घातली? माफीचा साक्षीदार करण्यास परवानगी देतो, पण सीबीआयला खरे खरे सांगा. आता खरे सांगायचे म्हणजे काय? जो खटला खोटेपणावर उभा आहे, त्यातला सगळ्यात खोटारडा गुन्हेगार आता माफीचा साक्षीदार बनून खरे काय सांगणार? त्यामुळे वाझे हा सीबीआयचा माफीचा साक्षीदार आहे की भारतीय जनता पक्षाचा, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आणि अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱ्या आरोपीसदेखील आज माफीचा साक्षीदार करून उद्या त्याला भाजपावासी केले तर आश्चर्य वाटायला नको. माफीचा साक्षीदार होण्यासाठी भाजपने स्वतंत्र कक्षच उघडला आहे काय?, असा खोचक टोला शिवसेनेनं लागवला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles