
पोलीस नागरिक सुरक्षा व जनजागृती सवांद कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
नागपूर: शहरातील चाणक्य पुरम, हुडकेश्वर-नरसाळा परिसरात होणाऱ्या चोरी-घरफोडी, फसवणुक, बालशोषन, ऑनलाईन फ्रॉड, घरगुती हिंसाचार, रस्त्यावर होणारे अपघात इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस प्रशासन व न्यायालय तर्फे पॅनल अँड. विधीसेवा प्राधिकरण यांच्या मार्फत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन चाणक्य पुरम शिव मंदिर ग्राउंड परिसरातील करण्यात आले होते.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे सौ.कविता ईसारकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक हुडकेश्वर पोलीस स्टेशन) ॲड.सौ.सुरेखा बोरकुटे (जिल्हा न्यायालय विधी सेवा), डॉ.राजु वाघ (संसद रस्ता सुरक्षा परिषद सदस्य) ॲड.सौ. स्मिता चौधरी मॅडम (पॅनल बोर्ड मेंबर जिल्हा न्यायालय) अखील पवार (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्यायालय नागपुर सदस्य), राजु भाऊ वैद्य (अशोका फाउंडेशन अध्यक्ष) मान्यवरांनी नागरीकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमचे आयोजक दिपक वाघमारे, सामाजीक, कार्यकर्ता, सौ.मीनाक्षी पाटील सामाजिक कार्यकर्त्या, वर्षा भगत, चाणक्य् पुरम बचत गट, नलिनी आंबुलकर, सामाजिक कार्यकर्ता, कार्यक्रमाचे नियोजन व आभार विजय तांदूलकर यांनी मानले. कार्यक्रमांचे सहआयोजक निर्मलाताई गजभिये, संगीता रंगारी, माया दीपक वाघमारे, सौ.लीलाताई तामगाडगे, विजय पाचपोर, हेमराज पाटील, विजय गावंडे, राम सात्रगार क्राईम ब्राच॓ नागपूर पोलीस, सिद्धाथॆ पाटील ASI नंदनवन पोलीस, रमेश ऊके सामाजीक कार्यकर्ता, विजय आबुलकर, गजानन ढबाले, मनोहरजी सोनकुसरे, विवेकानन्द भगत, कुभलकरजी सामाजिक कार्यकर्ते, पन्नालाल रामटेके, महल्ले भाऊ,विध्याथीॅ खांडेकर गुरूजी, मंगेश गुळधे सामाजिक कार्यकर्ते व हुडकेश्र्वर-नरसाळा परिसरातील नागरिकाची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.